महाराष्ट्रात वर्षाला 3 मोफत सिलेंडर कोणत्या कुटुंबांना मिळणार ?
काल २८ जूनला राज्य सरकारने अर्थसंकल्प सादर केला. अर्थमंत्री अजित पवार या अर्थसंकल्पातील(cylinders) तरतुदींची माहिती देत आहे. सरकार या अर्थसंकल्पात महिला, तरुण, शेतकरी या वर्गासाठी मोठ्या घोषणा केल्या आहे. विशेष म्हणजे याच अर्थसंकल्पात राज्य सरकार मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचीही घोषणा केली आहे. त्याचसोबत मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेची घोषणा केली आहे. या योजनेनुसार महिलांना वर्षाला तीन गॅस सिलिंडर मोफत मिळणआर आहेत. या योजनेचा फायदा 52 लाख कुटुंबियांना होणार आहे.
आता वर्षाला ३ मोफत सिलेंडर(cylinders) कुणाला मिळणार असा प्रश्न सध्या सर्वसामान्यांना पडला आहे. ही योजना सरसकट सगळ्यांना लागू होणार नाही. या योजनेसाठी काही नियम आहे. या योजनेतून राज्यातील ५६ लाख १६ हजार कुटुंबाना फायदा होणार असल्याची माहिती मिळत आहे.
‘या’ महिलांना वर्षाला ३ सिलेंडर मोफत मिळणार
‘बीपीएल रेशनकार्ड अर्थात पिवळं आणि केशरी रेशनकार्ड असणाऱ्या महिलांना वर्षाला ३ सिलेंडरचे पैसे थेट खात्यात मिळणार आहे. या माध्यमातून राज्यातील तब्बल ५६ लाख १६ हजार महिलांना याचा थेट फायदा होणार आहे.’
– राज्यात 10 हजार पिंक रिक्षा महिलांसाठी देण्यात येतील
– नवीन रुग्नवाहिका खरेदी केल्या जातील
– मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना राबिवली जाईल
– वर्षाला एका कुटुंबाला 3 सिलिंडर मोफत दिले जातील
– बच्चत गटाच्या निधीत 15 हजारांहून 30 हजार रुपयांची वाढ केली जाईल
– यावर्षी 25 लाख महिलांना लखपती दिदी बनवण्याचा शासनाचा विचार आहे
– व्यावसायिक शिक्षणामध्ये आठ लाख रुपयांचे उत्पन्न असलेल्या मुलींना शंभर टक्के सवलत दिली जाणार
हेही वाचा :
‘या’ गोष्टींची नक्की काळजी घ्या, पावसात भिजलात तरी तुम्ही आजारी पडणार नाही
कोल्हापुरात महापालिकेच्या सावित्रीबाई फुले रुग्णालयाचा बेभरवशी कारभार,