सांगली : ‘भाड्याने रहायला कोणत्या घरात जायचे?’ किरकोळ वादातून पतीने डोक्यात खोरे घालून संपवलं पत्नीला

पुण्यात किरकोळ वादातून(rent) एक भयंकर घटना घडली आहे. ‘भाड्याने रहायला कोणत्या घरात जायचे?’ या विषयावरून झालेल्या वादात पतीने पत्नीला डोक्यात खोरे घालून ठार मारलं. या हृदयद्रावक घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. पुण्यातील एका रहिवासी भागात राहणाऱ्या पती-पत्नीमध्ये घर बदलण्याच्या विषयावरून वाद सुरू झाला. वाद तसा किरकोळ होता, पण तो अचानक इतका विकोपाला गेला की पतीने संतापाच्या भरात डोक्यात खोरे घालून पत्नीचा जीव घेतला.

गुराप्पा शंकराप्पा इकुरोट्टी असे संशयित(rent) पतीचे नाव आहे. तर सलमा गुराप्पा इकुरोट्टी असे मृत महिलेचे नाव आहे. गुराप्पा नोकरीच्या निमित्ताने गेल्या काही महिन्यांपासून विटा येथे पत्नी आणि लहान मुलीसोबत वास्तव्यास आहे. विट्यातील खानापूर नाका परिसरातील भाड्याच्या खोलीत ते रहात होते.

बुधवारी रात्री विट्यातील हजारे मळा परिसरात भाड्याच्या घरात रहायला जाण्याच्या कारणावरून त्यांच्यात वाद झाला होता. यातूनच रागाने डोक्यात खोरे घालून वर्मी गाव करून पत्नीचा खून केल्याची घटना समोर आली आहे. याबाबत खुनाचा गुन्हा विटा पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे.

घटनेनंतर पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. पतीला ताब्यात घेण्यात आलं असून त्याच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्राथमिक चौकशीतून समजलं की, पती-पत्नीमध्ये आधीपासूनच काही कौटुंबिक समस्या होत्या, ज्यामुळे वाद-विवाद होत असत. या भयंकर घटनेमुळे परिसरातील नागरिकांमध्ये भयाचे वातावरण निर्माण झाले आहे. शेजाऱ्यांनी सांगितले की, पती-पत्नीमध्ये नेहमीच छोटे-मोठे वाद होत असत, परंतु या वादाचा शेवट असा होईल याची कल्पनाही केली नव्हती.

हेही वाचा :

मोठी बातमी! गोकुळनं केली दुधाच्या दरात वाढ

विजय परेडनंतर रात्री अचानक विराट कोहली लंडनला रवाना

विधानसभेसाठी उद्धव ठाकरेंनी रणनिती आखली; पहिलाच दणका भाजपला