हिवाळ्यात कोणते ज्यूस पिणे शरीरासाठी ठरते फायदेशीर ?

हिवाळ्यात शरीराला उष्णता आणि पोषण मिळवून देण्यासाठी काही विशेष ज्यूस(juice) उपयुक्त ठरतात. थंडीत रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी आणि शरीराला आवश्यक ऊर्जा मिळवण्यासाठी नैसर्गिक रसांचा आहारात समावेश करणे महत्त्वाचे आहे. चला जाणून घेऊया हिवाळ्यात पिण्यासाठी सर्वोत्तम ज्यूस आणि त्याच्या सोप्या रेसिपी.

1. गाजर-बीट ज्यूस
फायदे: गाजर आणि बीटमध्ये आयरन, अँटीऑक्सिडंट्स आणि फायबर भरपूर प्रमाणात असते. हा ज्यूस रक्तशुद्धीकरणास मदत करतो आणि त्वचेसाठी फायदेशीर असतो.

रेसिपी:
2 गाजर आणि 1 बीट स्वच्छ धुऊन छोटे तुकडे करा.
मिक्सरमध्ये टाकून अर्धा कप पाणी घाला.
गाळून ज्यूस काढा आणि त्यात लिंबू रस व(juice) किंचित मीठ घाला.

2. आलं-हळद ज्यूस
फायदे: हिवाळ्यात सर्दी-खोकला होण्याची शक्यता जास्त असते. आलं आणि हळदीमध्ये अँटी-बॅक्टेरियल गुणधर्म असतात जे संसर्गापासून बचाव करतात.

रेसिपी:
1 चमचा ताजे आलं आणि 1/2 चमचा हळद घ्या.
पाणी घालून मिक्सरमध्ये बारीक वाटा.
त्यात मध किंवा लिंबू घालून गरम किंवा कोमट प्या.

3. आवळा-तुळस ज्यूस
फायदे: आवळा आणि तुळशीमुळे शरीराची रोगप्रतिकारशक्ती वाढते. व्हिटॅमिन सी भरपूर असल्याने हिवाळ्यात हा ज्यूस अत्यंत फायदेशीर ठरतो.

रेसिपी:
2 आवळे कापून मिक्सरमध्ये वाटा.
त्यात 4-5 तुळशीची पाने आणि थोडेसे पाणी घाला.
गाळून त्यात मध आणि काळे मीठ(juice) घालून प्या.

4. संत्रा-ड्रायफ्रूट ज्यूस
फायदे: संत्र्यामध्ये व्हिटॅमिन C आणि ड्रायफ्रूट्समध्ये हेल्दी फॅट्स असतात जे थंडीपासून बचाव करतात.

रेसिपी:
1 संत्र्याचा रस काढा आणि त्यात 1 बदाम, 1 अक्रोड आणि 2 खजूर टाका.
मिक्सरमध्ये फिरवून गाळा आणि थोडा मध घालून प्या.

हिवाळ्यात हे ज्यूस शरीराला आवश्यक पोषण देतात, उष्णता निर्माण करतात आणि रोगप्रतिकारशक्ती वाढवतात. तुम्हालाही हिवाळ्यात तंदुरुस्त राहायचे असेल, तर नक्की हे आरोग्यदायी ज्यूस आपल्या आहारात समाविष्ट करा. 

हेही वाचा :

भन्नाट ऑफर! HP चा लॅपटॉप मिळतोय फक्त 10 हजारात, खरेदीची सुवर्ण संधी

महाराष्ट्र हादरलं! आई-वडिलांनीच मुलीला साखळदंडात डांबून ठेवलं, समाजात खळबळ

ऐश्वर्या राय बच्चनची लेक आराध्याची दिल्ली उच्च न्यायालयात धाव