गोविंदाचं अफेअर असलेली मराठी अभिनेत्री कोण बायकोच्या आरोपांनी खळबळ

बॉलिवूड अभिनेता गोविंदा आणि त्याची पत्नी सुनीता अहुजायांच्या घटस्फोटाच्या (affair)चर्चांनी सध्या जोर धरला आहे. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यातील मतभेद आणि तणाव वाढल्याचे बोलले जात आहे. विशेष म्हणजे, सुनीता अहुजांनी काही मुलाखतींमध्ये गोविंदासोबतच्या नात्याबाबत नकारात्मक वक्तव्ये केली होती. त्यानंतर त्यांच्या वैवाहिक जीवनावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.बॉलिवूडमध्ये सध्या चर्चा आहे की, गोविंदाचे एका ३० वर्षीय मराठी अभिनेत्रीशी संबंध आहेत. या अफेअरमुळेच त्यांच्या नात्यात दुरावा आल्याचे बोलले जात आहे. मात्र, ही अभिनेत्री नक्की कोण आहे, याबद्दल अधिकृत माहिती समोर आलेली नाही. सोशल मीडियावर या विषयावर जोरदार चर्चा सुरू आहे.

गोविंदाच्या व्यवस्थापकाने यासंदर्भात प्रतिक्रिया देताना सांगितले की, “सुनीता अहुजांनी वेगळं होण्यासाठी नोटीस पाठवली होती, पण त्यानंतर काही ठोस घडलेले नाही. सध्या गोविंदा त्याच्या आगामी प्रोजेक्ट्सवर लक्ष केंद्रित करत आहे.”या संपूर्ण प्रकरणावर सुनीता अहुजांनी अद्याप थेट प्रतिक्रिया दिलेली नाही. मात्र, त्यांच्या जुन्या मुलाखतींचे व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. एका मुलाखतीत त्यांनी (affair)सांगितले होते की, “मी आणि गोविंदा आता वेगळे राहतो.” याशिवाय, काही महिन्यांपूर्वी गोविंदाच्या पायावर गोळी लागली होती. त्यावेळी सुनीता अहुजांनी “जर मी त्याला गोळी मारली असती, तर ती थेट छातीवर मारली असती, पायावर नाही,” असं वादग्रस्त वक्तव्य केलं होतं.
गोविंदाच्या अफेअरच्या बातम्यांनी सिनेसृष्टीत खळबळ उडाली आहे. एका मराठी अभिनेत्रीसोबत त्याचं नाव जोडलं जात आहे. ही अभिनेत्री ३० वर्षाची असल्याचं सांगितलं जात आहे. दोघांचे (affair)गेल्या काही वर्षांपासूनचे प्रेमसंबंध असल्याची माहिती आहे. ही मराठी अभिनेत्री नेमकी कोण? तिचं नाव काय?, अशी चर्चा आता होताना पहायला मिळत आहे. मात्र अद्याप या मराठी अभिनेत्रीचं नाव पुढं आलेलं नाही.
दरम्यान, गोविंदा आणि सुनीता अहुजांच्या ३७ वर्षांच्या संसाराचा आता खरंच शेवट होणार का, की ही फक्त चर्चाच ठरणार, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
हेही वाचा :
धक्कादायक! शिवशाही बसमध्ये महिलेवर बलात्कार..
हार्दिकच्या गर्लफ्रेंडने सगळ्यांसमोर केलं असं काही, पाहा व्हायरल व्हिडीओ!
काय सांगता! शाहरुख खानने ‘मन्नत’ बंगला सोडला ? नेमकं कारण काय ?