दिल्ली कॅपिटल्सची कमान कोणाच्या हाती लागणार? ऋषभ पंतची जागा कोण घेणार?
इंडियन प्रीमियर लीग(IPL) २०२५ च्या रिटेन्शनमध्ये मोठे उलटफेज पाहायला मिळाले. यामध्ये अनेक संघानी मोठ्या खेळाडूंना रिलीज केले आहे आणि याचा धक्का क्रिकेट प्रेमींना लागला आहे. कोलकाता नाईट रायडर्सने २०२४ आयपीएलचे जेतेपद श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखाली जिंकले आणि केकेआरने आयपीएल २०२५ मधून श्रेयस अय्यरला रिलीज केले आहे.
त्यानंतर क्रिकेट प्रेमींना दुसरा धक्का लागला तो म्हणजेच दिल्ली कॅपिटल्सचा(IPL) कर्णधार रिषभ पंत. मागील काही वर्षांपासून दिल्ली कॅपिटल्सची कमान रिषभ पंत कडे सोपवण्यात आली होती. आयपीएल २०२४ च्या लिलावामध्ये सुद्धा रिषभ सहभागी झाला होता. परंतु आयपीएल २०२५ मधून त्याला दिल्ली कॅपिटल्सने आता रिलीज केले आहे.
दिल्ली कॅपिटल्स व्यवस्थापन आयपीएल 2025 साठी एक नवीन संघ तयार करण्याच्या तयारीत आहे. मेगा लिलावापूर्वी फ्रँचायझीने केवळ चार खेळाडूंना कायम ठेवले आहे. दिल्लीने आपला कर्णधार ऋषभ पंतलाही सोडले आहे. अशा परिस्थितीत फ्रँचायझी नवीन कर्णधाराच्या शोधात आहे.
अहवालांवर विश्वास ठेवला तर, दिल्ली कॅपिटल्सने आयपीएल 2025 साठी आपला कर्णधार निश्चित केला आहे. रिपोर्टनुसार, दिल्ली आता ऋषभ पंतच्या जागी अक्षर पटेलकडे कर्णधारपद सोपवणार आहे. मात्र, दिल्ली कॅपिटल्सने अद्याप याची अधिकृत घोषणा केलेली नाही, पण वृत्तांच्या मार्फत ही माहिती समोर आली होती.
आयपीएल २०२४ च्या नंतर अपघातातून सावरत रिषभने संघामध्ये पुनरागमन केले होते त्याचबरोबर तो ऑक्शनमध्ये सुद्धा सहभागी झाला होता. काही काळापूर्वी ऋषभ पंतनेही लिलावात जाण्याबाबत ट्विट केले होते. मात्र, त्यावेळी सर्वांनाच हा विनोद वाटला. रिषभ पंत आणि फ्रँचायझी यांच्यामध्ये गरमागरमीचे वातावरण असल्याचे वृत्त समोर आले होते. त्यानंतर दिल्लीने पंतला सोडले तेव्हा सर्व अंदाज आणि अहवाल बरोबर ठरले. दिल्ली कॅपिटल्सने अक्षर पटेलला 16.5 कोटी, कुलदीप यादवला 13.25 कोटी, ट्रस्टन स्टब्सला 10 कोटी आणि अभिषेक पोरेलला 4 कोटींमध्ये कायम ठेवले आहे. तथापि, आयपीएल 2025 मध्ये दिल्लीचा कर्णधार कोण असेल याबाबत फ्रँचायझीने कोणतीही घोषणा केलेली नाही.
आयपीएल 2025 साठी प्रत्येक संघाचे पर्स मूल्य 120 कोटी रुपये आहे. आयपीएल रिटेन्शनच्या नियमानुसार सर्व संघांना जास्तीत जास्त सहा खेळाडू कायम ठेवता येणार होते. दिल्ली कॅपिटल्सने एकूण चार खेळाडूंना कायम ठेवले आहे. रिटेन्शनच्या आधी दिल्ली कॅपिटल्सकडे 120 कोटींपैकी दिल्लीने चार खेळाडूंना रिटेन करण्यासाठी 43 कोटी 75 लाख रुपये खर्च केले आहेत. आता आयपीएल 2025 च्या मेगा लिलावात दिल्ली कॅपिटल्सकडे 76.25 कोटी रुपये असतील.
इंडियन प्रीमियर लीग २०२५ चा मेगा लिलाव २४ आणि २५ नोव्हेंबर रोजी आयोजित करण्यात आला आहे. यावेळी हा लिलाव अधिक मनोरंजक होणार आहे कारण यामध्ये अनेक मोठ्या नावांचा समावेश आहे. मोठ्या खेळाडूंवर संघ कितीची बोली लावणार याकडे चाहत्यांचे लक्ष्य असेल.
हेही वाचा :
रस्ता ओलांडताना भरधाव कारने दिली धडक, तरुणी हवेत…, थरारक Video Viral
महाविकास आघाडीमध्ये मोठी खळबळ! शरद पवार गटाच्या नेत्यांनी केली लाखोंची मागणी
“हनीमूनच्या रात्री, माझ्या शरीराचा…”, करिश्मा कपूरच्या गौप्यस्फोटाने बाॅलिवूड हादरलं!