श्रद्धा कपूरच्या मोबाईल वॉलपेपरवर हा कोणाचा चेहरा? अखेर ‘बॉयफ्रेंड’वरील प्रेम झालं Reveal

काल रविवारी बॉलिवूड अभिनेत्री श्रद्धा कपूर मुंबईत काही कामासाठी बाहेर गेली असताना, तिच्या मोबाईलचा वॉलपेपर (wallpaper) पापाराझींनी त्यांच्या कॅमेऱ्यात कैद झाला आहे. श्रद्धाच्या वॉलपेपरवर एका व्यक्तीसोबतचा फोटो दिसला, ज्याबद्दल चाहते आता सतत अंदाज लावत आहेत की ही खास व्यक्ती कोण आहे. श्रद्धाचा हा व्हिडीओ पाहून चाहत्यांच्या मनात आता अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत. तसेच याचदरम्यान आता आपण जाणून घेऊयात की हा फोटो कोणाचा आहे.

सोशल मीडियावर श्रद्धा कपूरच्या मोबाईल वॉलपेपरची(wallpaper) तिच्यापेक्षा जास्त चर्चा होत आहे. श्रद्धाच्या चाहत्यांना जाणून घेण्याची उत्सुकता आहे की ती खास व्यक्ती कोण आहे ज्याचा फोटो तिने तिच्या मोबाईल वॉलपेपरवर तिच्यासोबत ठेवला आहे. श्रद्धाच्या मोबाईल वॉलपेपरवर श्रद्धासोबतच्या एका व्यक्तीचा क्लोज-अप स्पष्टपणे दिसतो आहे, ज्यावर श्रद्धाचे चाहते आता सतत कमेंट करत आहेत. या व्हिडीओला चाहत्यांचा चांगलाच प्रतिसाद मिळाला आहे.

श्रद्धा कपूरच्या वॉलपेपरवरील या खास फोटोबद्दल, काही चाहते म्हणत आहेत की हा तिचा कथित बॉयफ्रेंड राहुल मोदी असू शकतो. यावेळी श्रद्धाने गुलाबी रंगाचा जॅकेट आणि फ्लॅट्ससह निळ्या रंगाचे लेगिंग्ज परिधान केली होती. अभिनेत्रीचा कॅज्युअल लूक चाहत्यांना खूप आवडला. श्रद्धाने कोणताही मेकअप केलेला नव्हता आणि तिने केस बांधले होते, जेव्हा श्रद्धा तिच्या गाडीकडे गेली तेव्हा तिच्या मोबाईलचा वॉलपेपर स्पष्ट दिसत होता, ज्यामध्ये तिच्यासोबत असलेल्या एका व्यक्तीचा फोटो स्पष्ट दिसत होता.

श्रद्धाचे चाहते तिच्या मोबाईलच्या वॉलपेपरवर सतत त्यांच्या कमेंट्स पोस्ट करत आहेत. अनेक चाहते म्हणतात की फोटोमध्ये दिसणारी व्यक्ती दुसरी तिसरी तिसरी कोणी नसून श्रद्धा कपूरचा कथित बॉयफ्रेंड राहुल मोदीसारखा दिसत आहे.

गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये श्रद्धा कपूरने राहुल मोदीसोबत संध्याकाळच्या फिरण्याची एक इंस्टाग्राम स्टोरी पोस्ट केली होती. ज्यात तिने वडा पावचा फोटो शेअर केला आणि कॅप्शनमध्ये लिहिले, “मी तुम्हाला नेहमी वडा पाव खाण्यास भाग पाडू शकते?” असे लिहून श्रद्धाने या पोस्टमध्ये राहुललाही टॅग केले होते. या फोटोचीही चर्चा सुरु झाली होती.

हेही वाचा :

वादग्रस्त शक्तिपीठ महामार्गाला पुन्हा ‘बळ’; हिरवा कंदील दाखवत राज्य सरकारचे पहिले पाऊल

नवीन कर प्रणालीमध्ये गृहकर्जात सूट मिळणार? अर्थसंकल्पात होऊ शकते मोठी घोषणा

आजपासून महाकुंभ मेळ्याला सुरवात! जाणून घ्या शाही स्नानाच्या तिथी