अपक्ष उमेदवार कोणाचे गणित बिघडवणार? कोल्हापूर जिल्ह्यात आतापर्यंत पाच जणांनी मारली बाजी

कोल्हापूर : विधानसभेच्या निवडणुकीत(politics) यंदा ६३ अपक्ष नशीब अजमावत आहेत. १९९९ ते २०२४ या काळातील ही सर्वाधिक सं‌ख्या आहे. अपक्ष कोणाचे गणित बिघडवणार, हे निकालानंतरच कळेल. मात्र गेल्या पंचवीस वर्षांत काेल्हापूर जिल्ह्यात केवळ पाच अपक्षांनीच बाजी मारली आहे.

विधानसभा निवडणुकीचे(politics) मतदान काही दिवसांवर आले आहे. प्रचारात चांगलीच रंगत आली असून काही मतदारसंघांत अपक्षांनी पक्षांच्या उमेदवारांना घाम फाेडला आहे. गेल्या पंचवीस वर्षांतील सर्वाधिक ६३ अपक्ष नशीब अजमावत आहेत. काही ठिकाणी तुल्यबळ अपक्ष नसले तरी चंदगड, राधानगरी, हातकणंगले, इचलकरंजी मतदारसंघात अपक्षांनी पक्षाच्या उमेदवारांची काेंडी केली आहे.

विधानसभेच्या २००४ च्या निवडणुकीत तब्बल तीन अपक्षांना यश मिळाले. शिरोळमधून राजू शेट्टी, राधानगरीतून के. पी. पाटील तर करवीरमधून सतेज पाटील निवडून आले होते. त्यानंतरच्या दोन निवडणुकांत मतदारांनी अपक्षांना संधी दिली नाही. मात्र, २०१९ च्या निवडणुकीत इचलकरंजीतून प्रकाश आवाडे, तर शिरोळमधून राजेंद्र पाटील-यड्रावकर विधानसभेत पाेहचले.

अनेक निवडणुकांत अपक्ष उमेदवारांचे डिपॉझिट जप्त होते, तरीही निवडणूक लढवण्याची हौस काही थांबत नाही. काहींना तर विधानसभा, लोकसभा निवडणुकीत अर्ज दाखल करायचाच याची हौस असते.

निवडणूक – अपक्ष उमेदवार

१९९९ – २०
२००४ – २३

२००९ – ४७
२०१४ – ३९
२०१९ – ५२
२०२४ – ६३

23 नोव्हेंबरला निकाल

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरु झाली आहे. येत्या 20 नोव्हेंबरला राज्यात विधानसभा निवडणुकांसाठी मतदान होणार आहे. तर 23 नोव्हेंबरला निकाल जाहीर होणार आहे. यंदा विधानसभा निवडणुकीत महायुती विरुद्ध महाविकासआघाडी अशी लढत पाहायला मिळणार आहे. यामध्ये आता अपक्ष उमेदवारांनीही जोरदार तयारी केली आहे. त्यामुळे कोण विजयी होणार हे निकालानंतर चित्र स्पष्ट होईल.

महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीची आदर्श आचारसंहिता 15 ऑक्टोबर 2024 पासून लागू झाली आहे. विधानसभा निवडणुकीची अधिसूचना 22 ऑक्टोबर 2024 रोजी जारी करण्यात आली होती. त्यानंतर मंगळवार 29 ऑक्टोबर 2024 ही उमेदवारी अर्ज भरण्याची अंतिम तारीख होती.

यानंतर आज 30 ऑक्टोबर 2024 रोजी अर्जांची छाननी केली जाणार आहे. यानंतर 4 नोव्हेंबर 2024 पर्यंत उमेदवारांना उमेदवारी अर्ज मागे घेता येणार आहे. यानंतर 20 नोव्हेंबर 2024 रोजी मतदान होईल आणि 23 नोव्हेंबर 2024 रोजी मतमोजणी होईल.

हेही वाचा :

‘मुख्यमंत्री होणं माझ्यासाठी..’; CM पदाबाबत देवेंद्र फडणवीसांचा सर्वात मोठा खुलासा

कोल्हापुरात उद्या गांधी मैदानात ‘महाराष्ट्र स्वाभिमान’ गरजणार; प्रियांका गांधी पहिल्यांदाच करवीरनगरीत!

भूमिपुत्राला निवडून द्या, कोल्हापूरचं पार्सल परत पाठवा, संजय राऊतांचा चंद्रकांत पाटलांना टोला