काँग्रेसचा बडा नेता संकेत बावनकुळेंना का वाचवत आहे? सुषमा अंधारेंचा आरोप
नागपूर: राज्यात विधानसभा निवडणुका तोंडावर आल्या असतानाच आता महाविकास आघाडीतील(politics) वादही चव्हाट्यावर आला आहे. ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी नागपूर काँग्रेसचे अध्यक्ष आमदार विकास ठाकरे यांच्यावर गंभीर आरोप केला आहे. नागरपूरमध्ये भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या मुलगा संकेत बावनकुळे याने केलेल्या अपघाताप्रकरणी आता अंधारे यांनी विकास ठाकरे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत.
विकास ठाकरे यांची नक्की काय मजबूरी आहे, ते संकेत बावनकुळेंना (politics) का वाचवत आहे, विकास ठाकरे यांच्याकडे पुरावे होते तर ते 36 तास गप्प का बसले, असा सवाल अंधारे यांनी उपस्थित केला आहे. तसेच, यात काही काही ‘गिव्ह अँड टेक’ स्थानिक राजकारण असू शकते, अशी शंकाही त्यांनी व्यक्त केली आहे. पण ‘गिव्ह अँड टेक’ याचा अर्थ पैशाचा नाही. अनेकदा स्थानिक राजकारण जुळवून घेण्यासाठीदेखील विकास ठाकरे प्रयत्न विकास ठाकरे करत असावेत. पण विकास ठाकरे यांची ही भूमिका भाजपला मदत करण्यासाठी आहे, असा टोला अंधारेंनी लगावला आहे.
अपघातावेळी अर्जून हावरे नावाचा मुलगाही गाडीत होता. त्याच्या वडिलांचे आणि विकास ठाकरे जे बोलत आहेत. त्याचा नेमका काय संबंध आहे, हेही तपासले पाहिजे, असे सुषमा अंधारे यांनी म्हटले आहे. “रविवारी मध्यरात्री अपघात झाला. जर विकास ठाकरे म्हणत आहे की त्यांच्या मतदारसंघातली घटना आहे, तर तुम्हाला सकाळीच व्यक्त व्हायला काय झालं होते., त्य़ांच्य़ाकडे पुरावे होते तर ते 36 तास गप्प का बसले, असेही त्यांनी विचारले आहे.
चंद्रशेखर बावनकुळे म्हणातात या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी व्हायला पाहिजे,पण कायदा सर्वांसाठी सारखा असला पाहिजे.पण संकेत बावनकुळेंचे नावच एफआयआरमध्ये नसेल तर निष्पक्ष चौकशी कशी होईल, असा सवालही त्यांनी विचारली आहे. तसेच, अपघातात जे जखमी झाले त्यांच्यावर काही दबाव आहे का, तक्रारदारांवर काही दबाव आहे, याची चौकशी होणार आहे का, य़ाची चौकशी होणार आहे का,असेही त्यांनी विचारले आहे.
त्याचबरोबर, जेव्हा बाकीचे मित्र दारू प्यायला गेले होते. तेव्हा संकेत बावनकुळे काय दुध प्यायला गेले होते का, असा खोचकटोलाही त्यांनी लगावला आहे. अशाएनेकगोष्टी आहे, समाजाव्या लागतील.
भाजपचा जागावाटपाचा प्रश्न अंतर्गत आहे, मी त्यावर बोलणार नाही,पण भाजप या सर्वांना वापरून त्यांनाच संपवता आहे. अजित पवार यांच्या गटाचे प्रवक्ते आणि शिंदे गटाचे नेतेही बोलत आहेत. पण ज्याला ठेच लागते, त्यालाच कळते. त्यामुळे भविष्यात भाजप काय आहे ते हळूहळू लोकांनाह कळेल ,असा टोला सुषमा अंधारे यांनी लागवला.
हेही वाचा:
युट्युबर्ससाठी आनंदाची बातमी! डीपफेक्सचा धोका होणार कमी
यंदाचं गौरी पूजन दिवस 3 राशींसाठी ठरणार खास; 11 सप्टेंबरपासून उजळणार नशीब
वजन कमी करण्यासाठी प्रभावी योग आसन: हे तीन आसन करा आणि लगेच रिझल्ट पहा