श्रावण महिन्यात मांसाहार का टाळावा? जाणून घ्या शाकाहारी आहाराचे वैज्ञानिक फायदे
भारतीय परंपरेत श्रावण महिना हा धार्मिक आणि सांस्कृतिकदृष्ट्या विशेष मानला जातो. या महिन्यात शाकाहारी (vegetarian)आहाराचा विशेष आग्रह धरला जातो, आणि मांसाहार टाळण्याची परंपरा आहे.परंतु, केवळ धार्मिक कारणेच नव्हे, तर यामागे ठोस वैज्ञानिक कारणेही आहेत.
श्रावण महिना हा पावसाळ्याच्या मध्यभागी येतो. पावसाळ्यामुळे वातावरणात आर्द्रता वाढलेली असते, ज्यामुळे पचनसंस्था कमजोर होण्याची शक्यता असते. अशा वेळी मांसाहाराचे सेवन हे शरीरासाठी हानिकारक ठरू शकते, कारण मांस पचायला अधिक वेळ घेतं आणि या काळात पचनक्रिया कमजोर होऊ शकते. यामुळे अपचन, पोटदुखी आणि इतर पचनाशी संबंधित त्रास उद्भवू शकतात.
शाकाहारी आहारात भरपूर प्रमाणात ताज्या फळे, भाज्या, आणि धान्यांचा समावेश असतो, ज्यामुळे शरीराला आवश्यक पोषक तत्वे मिळतात आणि पचनक्रिया सुधारते. याशिवाय, पावसाळ्यात पाण्यामुळे होणाऱ्या संसर्गाचे प्रमाण अधिक असते, आणि मांसामध्ये जीवाणूंच्या वाढीची शक्यता जास्त असते. त्यामुळे मांसाहार टाळून शाकाहारी आहार स्वीकारल्यास आरोग्याला संरक्षण मिळते.
सध्याच्या काळातही, श्रावणात शाकाहारी आहाराचे पालन केल्यामुळे आरोग्यदायी जीवनशैलीची जाणीव होते. शाकाहारी आहारामध्ये शरीराला आवश्यक असलेल्या जीवनसत्वे, खनिजे आणि फायबर्स मिळतात, ज्यामुळे शरीराच्या प्रतिकारशक्तीत वाढ होते.
या वैज्ञानिक कारणांमुळेच श्रावण महिन्यात मांसाहार टाळून शाकाहारी आहार घेण्याचे महत्त्व अधोरेखित केले जाते. त्यामुळे श्रावणात शाकाहाराचे पालन केल्यास शारीरिक आणि मानसिक आरोग्य सुधारण्यासाठी मदत होते, हे निश्चित.
हेही वाचा :
२२ वर्षीय तरुणाची आधुनिक शेतीतील क्रांती: एरोपोनिक्स तंत्राने केशर लागवड करून बनला लाखोपती
जयंत पाटलांची फडणवीसांवर कडवी टीका; “महाराष्ट्राच्या सुरक्षेकडे दुर्लक्ष”
‘CA’ पदवीधरांच्या कमी पगारावरून TCS वादाच्या भोवऱ्यात, सोशल मीडियावर टीकेची झोड