का झालेला सामंथा आणि नागा चैतन्य यांचा घटस्फोट?
लोकप्रिय दाक्षिणात्य अभिनेता नागा चैतन्य याने ८ ऑगस्ट २०२४ रोजी अभिनेत्री(divorce) शोभिता धूलिपाला हिच्याशी साखरपुडा केला. त्यांनी अक्किनेनी यांच्या राहत्या घरी हा कार्यक्रम केला. अभिनेते नागार्जुन यांनी मुलाच्या दुसऱ्या साखरपुड्याचे फोटो चाहत्यांसोबत शेअर केले.
मात्र त्यानंतर सोशल मीडियावर(divorce) सामंथाच्या नावाची एकच लाट आली. अनेकांनी नागा चैतन्य याला ट्रोल केलं. हिरा सोडून चांदीच्या मागे लागला असं म्हणत त्याची खिल्ली उडाली. मात्र जेव्हा सामंथा आणि नागा चैतन्य यांनी त्यांच्या घटस्फोटाबद्दल सांगितलं होतं तेव्हा चाहत्यांना मोठा धक्का बसला होता. नेमकं काय होतं त्यांच्या घटस्फोटाचं कारण?
सामंथा आणि नागा चैतन्य यांनी २०१७ मध्ये लग्नगाठ बांधली होती. मात्र लग्नाच्या चार वर्षात ते वेगळे झाले. त्यांनी आपल्या घटस्फोटाचं कारण सांगितलं नसलं तरी चाहते हे ऐकून शॉक झाले होते. त्यानंतर त्यांच्या घटस्फोटाबद्दल अनेक अंदाज लावले गेले. त्यातील सगळ्यात मोठं कारण हे सामंथाचे चित्रपट सांगण्यात आलं. सामंथाच्या बोल्ड भूमिकांवर नागा चैतन्यचा आणि कुटुंबियांचा आक्षेप होता.
एका मुलाखतीत बोलताना अभिनेता म्हणालेला, मी अशा कोणत्याही भूमिका करणार नाही ज्यामुळे माझ्या घरातल्यांना फरक पडेल. असं म्हणत त्याने सामंथाला टोला लगावला होता. यासोबतच सामंथाचा अक्किनेनींच्या व्यवसायातील वाढता सहभाग देखील एक कारण असल्याचं सांगितलं जातं.
तर घटस्फोटानंतर काही महिन्यातच अभिनेता अभिनेत्री शोभितासोबत वेळ घालवताना दिसला. त्यावरून चाहत्यांनी नागा चैतन्यने सामंथाची फसवणूक केली असल्याचं देखील बोललं गेलं. अखेर आता नागा चैतन्य तिच्यासोबत विवाहबद्ध होण्यास सज्ज आहे. त्यामुळे त्या अफवा खऱ्या होत्या असं नेटकऱ्यांचं म्हणणं आहे. तर दुसरीकडे सामंथा अजूनही काही गंभीर आजाराशी लढा देते आहे.
हेही वाचा:
धबधब्यवरची स्टंटबाजी तरुणीला चांगलीच महागात पडली, तोल गेला अन्…
भरधाव कारचालकाने दुचाकीस्वाराला 100 ते 200 फूट फरफटत नेले, VIDEO
आजीच्या पेन्शनवरून थेट बँकेत चाकू हल्ला…