अयोध्येत भाजपचा पराभव का झाला? राहुल गांधी म्हणाले..
राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला फक्त श्रीमंत लोकांनाच आमंत्रित करण्यात आलं होतं. या सोहळ्यात अदानी, अंबानी यांच्यासह संपूर्ण बॉलीवूड दिसलं, पण एकही गरीब दिसत नव्हता. या समारंभासाठी कोणत्याही दलित किंवा आदिवासीला आमंत्रित करण्यात आलं नव्हतं(president). राष्ट्रपतींनाही आमंत्रण दिलं नाही. त्यामुळेच अयोध्येतील जनतेने भाजपचा या जागेवर पराभव केल्याचा दावा राहुल गांधी यांनी केला आहे.
राहुल गांधी यांनी वायनाड आणि रायबरेलीतून लोकसभा निवडणूक लढवली होती. या दोन्ही जागांवर त्यांचा विजय झाला आहे. त्यामुळे कोणत्याही एका जागेवरचं सदस्यत्व त्यांना सोडावं लागणार आहे. दरम्यान निवडणूक निकालानंतर आज त्यांनी रायबरेलीत कृतज्ञता सभा घेतली. या सभेत त्यांनी नरेंद्र मोदी आणि भाजपवर जोरदार टीकास्त्र सोडलं.
‘नफरत की बाजार मे महोब्बत की दुकान’
देशातल्या जनतेने मतदानाच्या माध्यमातून नरेंद्र मोदी आणि भाजपला उत्तर दिलं आहे. द्वेष आणि हिंसाचाराचं राजकारण त्यांना नको असल्याचं त्यांनी दाखवून दिलं आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांनी मुख्य मुद्द्यांपासून न भरकटता काम केलं पाहिजे. देशातील महत्त्वाच्या प्रश्नांवर राजकारण कराव लागतं. ‘नफरत की बाजार मे महोब्बत की दुकान’ सुरू करायचं आहे, असं आवाहन त्यांनी कार्यकर्त्यांना केलं आहे.
जे काम रायबरेलीत ते अमेठीतही’
उत्तर प्रदेशच्या जनतेने हेही दाखवून दिलं आहे की देशातचं नाही तर राज्यातही त्यांना सपा आणि काँग्रेस एकत्र हवे आहेत. रायबरेलीतील जनतेने भरभरून प्रेम दिलं आहे, त्यांचं हे प्रेम कधीही विसरू शकत नाही. मी रायबरेलीचा खासदार आहे, पण अमेठीच्या जनतेला दिलेले वचनही मी पूर्ण करणार आहे. जे काम रायबरेलीत होणार आहे तेच काम अमेठीतही होणार असल्याचा विश्वास त्यांनी दिला.
‘श्रीमंत-गरीब दरी कमी करण्यासाठी राजकारण व्हावं’
इंडिया आघाडीतील सर्व घटक पक्ष आणि त्यांचे कार्यकर्ते एकत्र लढले. त्याची सुरुवात रायबरेली अमेठीपासून झाली. देशातील गरिबांना मदत करण्याचं राजकारण व्हावं, अशी माझी इच्छा आहे. राहुल गांधींनी आपल्या भाषणात अग्निवीर योजनेचाही उल्लेख केला. लोकसभेच्या सभागृहातआमची संपूर्ण सेना बसणार आहे. विरोधात बसून अग्निवीर योजना संपवण्याचा प्रयत्न करणार असल्याचं त्यांनी सांगितलं.
‘वाराणसीच्या जनतेने मोदींना संदेश दिलाय’
पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाराणसीत निसटता विजय मिळाला आहे. जर प्रियंका गांधी यांनी वाराणसीतून निवडणूक लढवली असती तर नरेंद्र मोदी 2 ते 3 लाख मतांनी पराभूत झाले असते. हे मी अहंकाराने सांगत नाही. हा भारतातील जनतेचा पंतप्रधान मोदींना संदेश आहे की द्वेषाचं राजकारण या देशाला नको आहे, असा टोला त्यांना मोदींना लगावला
हेही वाचा :
सांगली दुष्काळी भागात सरासरीच्या दुप्पट पाऊस
कॉल गर्लमुळे तरुणाची आत्महत्या, गुगलवरील कॉल गर्लचा मोबाईल नंबर बेतू शकतो जीवावर.
पत्नी सोडून गेल्याने पती निराश, दारूच्या नशेत पतीनं असं काही केलं की?