बायको बॉयफ्रेंडसोबत पळाली, नवरा संतापला, पाच पोरांसह घर पेटवलं अन् मग…
बांदा: बायको पाच मुलं आणि नवऱ्याला सोडून बॉयफ्रेंडसोबत(boyfriend) पळून गेली. त्यानंतर संतापलेल्या पतीने जे केलं ते पाहून पोलिसही हादरले. या व्यक्तीने आपलं अख्खं घर पेटवलं. पाहता पाहता आगीने रौद्ररुप धारण केलं. यावेळी मुलं घरातच होती. या घटनेची माहिती मिळताच पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाली आणि त्यांनी शर्थीचे प्रयत्न करत आगीवर नियंत्रण मिळवलं आणि कसंबसं मुलांना वाचवलं.
उत्तर प्रदेशातील बांदा येथील करतल येथील ही घटना असल्याची माहिती आहे. येथे राहणाऱ्या (boyfriend)लल्लूच्या घराला रात्री २ वाजेच्या सुमारास अचानक आग लागली. शेजारच्यांनी याबाबतची माहिती पोलिसांनी दिली. तेव्हा लल्लूने पोलिसांना येऊ नका असं सांगितलं. त्यानंतर जेव्हा पोलीस घटनास्थळी पोहोचली तेव्हा समोरील दृश्य पाहून त्यांनाही धक्का बसला.
एका घराला आग लागलेली होती. कोणीही आग विझवण्याचा प्रयत्न देखील करत नव्हतं. लल्लूचे पाच मुलं आणि वृद्ध आई घराच्या आत होते. पोलिसांनी मोठ्या प्रयत्नांनंतर त्यांना सुरक्षित घरातून बाहेर काढलं.
जेव्हा पोलिसांनी या प्रकरणाविषयी चौकशी केली तेव्हा इतर कोणी येथे आलं नसल्याचं समजलं. मग, लल्लूची चौकशी केली, तेव्हा त्याने जे सांगितलं ते ऐकून पोलिसांनाही धक्का बसला. माझी बायकोला शेजारच्या गावातील एका व्यक्ती घेऊन गेला, त्यानेच घराला आग लावली असा आरोप लल्लूने केला. त्यानंतर, पोलिसांनी या प्रकरणाबाबत कसून तपास केला. तेव्हा कळालं की लल्लू हा घराला आग लागल्यावरही आग विझवण्यासाठी काहीच प्रयत्न करत नव्हता. तो बाहेर खाटेवर आराम करत होता.
जेव्हा त्याला आग का विझवली नाही, याचं कारण विचारण्यात आलं, तेव्हा त्याने सांगितलं की पाणी नव्हतं. जेव्हाकी पोलिसांनी जवळच्याच खड्ड्यातून पाणी आणून आग विझवली होती. त्यानंतर पोलिसांना कळालं की बायको सोडून गेल्याने रागाच्या भरात त्यानेच घराला आग लावली. पोलिसांनी त्याला रेशन आणि थोडं सामान दिलं आणि प्रकरणाचा तपास सुरु केला.
रात्री दोन वाजताच्या सुमारास एका घराला आग लागल्याची माहिती मिळाली, तात्काळ पोलीस आणि अग्निशमन दल घटनास्थळी पोहोचले. त्यानंतर गावकऱ्यांच्या मदतीने आगीवर नियंत्रण मिळवण्यात आलं. सध्या सगळे सुरक्षित आहेत, अशी माहिती पोलीस अधिकारी रोशन कुमार गुप्ता यांनी दिली.
हेही वाचा :
अर्थसंकल्प २०२४: ईव्ही खरेदीदार, नोकरदार वर्ग आणि आरोग्य विम्यासाठी खुशखबर!
हार्दिक पांड्याला मुंबई इंडियन्सच्या कर्णधारपदावरुनही हटवणार?
विधानसभेआधीच काडी! भाजपाच्या बैठकीत शिंदे-राष्ट्रवादी विरोधी सूर