‘बाईच्या नादामुळं जो बापाचा नाय झाला…’, टीम इंडियाच्या ‘या’ खेळाडूवर पत्नीचा खळबळजनक आरोप
टीम इंडियाचा वर्ल्ड कप स्टार गोलंदाज मोहम्मद शमी याच्यावर(Team India) काही दिवसांपूर्वी शस्त्रक्रिया झाली होती. अशातच आता तो बरा होताना दिसतोय. फादर्स डे निमित्त मोहम्मद शमीने वडिलांचा एक फोटो शेअर केला अन् फादर्स डेच्या शुभेच्छा दिल्या होता. सोशल मीडियावर त्याने पोस्ट केली होती. त्यावरून आता शमीची पत्नी हसीन जहाँ हिने सोशल मीडिया पोस्ट करत शमीवर धक्कादायक आरोप केले आहेत. हसीन जहाँची पोस्ट सध्या व्हायरल होत आहे. नेमके आरोप काय केलेत?
काही लोक किती बेफिकीर असतात. काही लोकांमध्ये(Team India) माणुसकी आणि देवाचं भय का नसतं? बाईच्या नादामुळे जो बापाला बापच मानला जात नाही आणि मग बिचाऱ्या बापाचा मृत्यू झाला की मग सगळेच फोटो सोशल मीडियावर टाकून फसवतात. जो स्वत:च्या बापासाठी करू शकला नाही, तो वडिलांच्या वेदना कशा समजणार? अशी खरमरीत टीका हसीन जहाँने केली आहे.
मोहम्मद शमीच्या पत्नीने मार्च 2018 मध्ये घरगुती हिंसाचाराचा गुन्हा दाखल केला होता. हसीन जहाँने आपल्या तक्रारीत शमीवर शारीरिक अत्याचार केल्याचा आरोप केला होता. तसेच मानसिक त्रास देत असल्याची तक्रार देखील करण्यात आली होती. दोघांविरुद्ध अटक वॉरंटही जारी केलं होतं. मात्र, कोलकाता न्यायालयाने या वॉरंटला स्थगिती दिली होती. त्याआधी, मोहम्मद शमीने हसीन जहाँला मासिक देखभाल भत्ता 1.30 लाख देण्याचे आदेश दिले होते.
दरम्यान, मोहम्मद शमी वनडे वर्ल्ड कपनंतर टीम इंडियातून दुखापतीमुळे बाहेर पडला. शमीच्या भेदक गोलंदाजीमुळे टीम इंडियाला वनडे वर्ल्ड कपच्या फायनलपर्यंत जाता आलं.
मात्र, घोट्याच्या दुखापतीमुळे मोहम्मद शमी गेल्या तीन महिन्यांपासून टीम इंडियातून बाहेर आहे. त्यानंतर लंडनमध्ये शमीवर शस्त्रक्रिया देखील करण्यात आली होती. अशातच आता शमी पुन्हा पायावर उभा रहायला लागला आहे.
हेही वाचा :
“जोडी लाखात एक..”इस प्यार को क्या नाम दूं?, कुत्रा आणि माकडाचं गच्चीवरचं प्रेम..
सांगली मंदीमुळे विट्यात निर्णय आठवड्यात तीन दिवस यंत्रमाग बंद.
‘बाबरी मशीद’ गायब? बारावीच्या पाठ्यपुस्तकातून, वाद टाळण्यासाठी गाळला इतिहास