सनातन धर्म रक्षणासाठी स्वतंत्र मंत्रालयाची स्थापना होणार? 

लवकरच विधानसभा निवडणूक होणार आहे. विधानसभा निवडणूक पार्श्वभूमीवर नवं नवीन मुद्दे पक्षांकडून उपस्थितीत करण्यात येत आहेत. त्यात अजून एका मुद्दाची भर पडली आहे. सनातन धर्म रक्षणासाठी सनातन मंत्रालयाची(ministry) स्थापना करावी अशी मागणी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याकडे करण्यात आलीय. त्यामुळे यंदा विधानसभा निवडणुकीत हा मुद्दा गाजण्याची शक्यता आहे. अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाचे अध्यक्ष डॉ. गोविंद कुलकर्णी यांनी पत्राद्वारे ही मागणी केल्याच सांगितलं.

तिरुपती बालाजी मंदिरात भाविकांना दिला जाणाऱ्या प्रसादात जनावराची चरबी मिसळल्यानंतर हिंदू समाज आणि सनातन धर्म आक्रमक झाला आहे. धर्माच्या संरक्षणासाठी सनातन धर्म रक्षणासाठी स्वतंत्र मंत्रालयाची(ministry) मागणी जोर धरतंय.

हिंदू धार्मिक परंपरा आणि श्रद्धेला धक्का पोहोचवण्याचा प्रयत्न समाजकंटकांकडून करण्यात येत आहे, असा आरोप डॉ. गोविंद कुलकर्णी यांनी केलाय. अल्प संख्यांसाठी सरकारकडून संरक्षण देण्यात येतं, मग बहुसंख्य लोकांसाठी हा दुजाभाव का असा प्रश्नही त्यांनी उपस्थितीत केलाय.

त्यामुळे भविष्यात अशा घटना घडू नयेत, याकरिता ब्राह्मण महासंघाकडून जनजागृती मोहीम हाती घेतली जाणार असून स्वतंत्र मंत्रालय उभारावे अशी मागणी करण्यात आलीय. या मंत्रालयावर धर्माशी संबंधित लोकांची नियुक्ती करण्यात यावी असंही ते म्हणाले.

मंदिर व्यवस्थापनासाठी ज्या समित्या स्थापन केल्या जातात, त्या समित्यांवरील सदस्य हिंदू असणे आवश्यक नाही, अशी तरतूद आहे. सरकारच्या अशा प्रकारच्या निर्णयामुळे हिंदू लोकांच्या भावनांना धक्का पोचवण्यास बळ मिळत आहे. मंदिरातील सर्व कामे धर्मशास्त्रांनुसार झाली पाहिजेत. या पार्श्वभूमीवर सनातन मंत्रालयाची स्थापना केली जावी, अशी मागणी कुलकर्णी यांनी केली.

सनातन मंत्रालयाला वंचितचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी विरोध केलाय. ते म्हणाली की…’सनातन धर्म म्हटला की, भेदभाव, जाती धर्म, अस्पर्शता आली, इथे धर्म वर्चस्व आलं. त्याचा आमचा पूर्णपणे विरोध आहे. सनातन धर्माला आमचा विरोध आहे. हिंदू धर्माला आमचा विरोध नाही.

हेही वाचा :

भारताच्या ‘या’ स्टार खेळाडूचा भीषण अपघात; कार चार-पाच वेळा आपटली

लग्नाच्या काही महिन्यातच सोनाक्षी नवऱ्याला त्रासली?, धक्कादायक खुलासा समोर

100 हून अधिक वस्तूंवरील जीएसटी 12 टक्क्यांवरुन 5 टक्के होण्याची शक्यता