पश्‍चिम महाराष्ट्रात अजितदादांना बसणार धक्का? ‘हा’ माजी खासदार भाजपच्या वाटेवर

 सांगली लोकसभा मतदारसंघातून भाजपच्या तिकिटावर दोनवेळा खासदार झालेले (western)व विधानसभेच्या तोंडावर राष्ट्रवादी अजित पवार पक्षात प्रवेश करून तासगावची विधानसभा निवडणूक लढवलेले माजी खासदार संजय पाटील पुन्हा भाजपच्या वाटेवर आहेत. ता. १६ कोल्हापुरात भाजपचे मंत्री चंद्रशेखर बावनकुळे  यांच्या उपस्थितीत झालेल्या पश्‍चिम महाराष्ट्र संघटन पर्व कार्यक्रमास पाटील यांनी थेट व्यासपीठावर हजेरी लावून हे संकेत दिले आहेत.दरम्यान, पाटील हे आम्हा सर्वांचे चांगले मित्र आहेत. कोल्हापुरातील कार्यक्रमाला ते मित्र म्हणूनच आले. त्यामुळे ते व्यासपीठावर बसले, असा खुलासा सांगलीचे पालकमंत्री व उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगलीत ‘सकाळ शी बोलताना केला.

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या तयारीचा भाग म्हणून काल महासैनिक दरबार हॉलमध्ये भाजपच्या पश्‍चिम महाराष्ट्र संघटन पर्वाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमाला कोल्हापूरसह सांगली, सातारा, सोलापूर आदी जिल्ह्यांतील भाजपचे मंत्री, आमदार, खासदार यांना निमंत्रित केले होते.

याच कार्यक्रमाच्या (western)व्यासपीठावरच मंत्री बावनकुळे बोलत असताना त्यांच्या मागे खुर्चीवर बसलेल्या माजी खासदार पाटील यांना पाहून अनेकांचे डोळे विस्फारले. पाटील हे भाजपच्या तिकिटावर २०१४ व २०१९ मध्ये सांगली लोकसभा मतदारसंघातून विजयी झाले होते. पण, २०२४ च्या विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर त्यांनी राष्ट्रवादी अजित पवार पक्षात प्रवेश केला. त्यानंतर निवडणुकीत त्यांनी तासगांव मतदारसंघातून पक्षाची उमदेवारीही मिळवली.

या निवडणुकीत त्यांचा पराभव झाल्यापासून ते राष्ट्रवादी अजित (western)पवार पक्षापासून दुरावल्याची चर्चा होती. त्यातच त्यांनी काल भाजपच्या बैठकीला थेट व्यासपीठावरच हजेरी लावून पुन्हा भाजप प्रवेशाचे संकेत दिले आहेत. सांगली जिल्ह्याच्यादृष्टीने ही महत्त्वाची राजकीय घडामोड समजली जाते. पाटील हे पुन्हा भाजपमध्ये जाऊन २०२९ च्या लोकसभा उमेदवारीचे दावेदार म्हणून पुढे येण्याची शक्यता आहे.

हेही वाचा :

250 रुपयांत SIP योजना, गुंतवणूकदारांना मोठी संधी

Box Office वर ‘छावा’ची गर्जना; लवकरच 200 Cr क्लबमध्ये….

महावितरणाच्या नवीन नियमावलीमुळे घरगुती वीजग्राहकांना ‘शॉक’!