छगन भुजबळ ठाकरे गटात येणार? ठाकरे गट मोदींकडे जाणार?

 शिवसेनेच्या 58 व्या वर्धापनदिनाच्या कार्यक्रमात भाषण (speech)करताना उद्धव ठाकरेंनी भाजपवर चौफेर टीका केली.  ठाकरे गट  एनडीएसोबत जाण्याची चर्चा रगंली आहे. मंत्री छगन भुजबळ हे ठाकरे गटात येणार असल्याची चर्चा रंगली आहे. उद्धव ठाकरे यांनी भर सभेत याचा खुलासा केला आहे. 
 
एनडीएसोबत जाण्याच्या चर्चांना उद्धव ठाकरेंनी पूर्ण विराम दिला आहे. तर,  भुजबळांनीही संपर्क केला नाही की ठाकरे गटाकडूनही भुजबळांना संपर्क केला नसल्याचं म्हटलंय. आत्मविश्वास व अहंकारात फरक आहे. मोदींमध्ये अहंकार आहे. भुजबळ शिवसेनेत जाणार..ते मंत्री आहे ते बघतील ना असा खुलासा उद्धव ठाकरेंनी केला आहे.  

मध्यावधी निवडणूक लागली तर हरलेले तुम्ही खासदार होणार आहात…सरकार चालणार नाही..अन्यथा इ़ंडिया आघाडीचे सरकार स्थापन करू..आम्हाला होय सर्वांची मते पडली. डोमकावळे म्हटल्यावर पिंडदान आलेच. मोदींनी सत्तेसाठी हिंदुत्व सोडले आहे. आज नायडू व नितीशकुमार हे काय हिंदुत्ववादी आहेत काय…चंद्राबाबू व नितीशकुमारांनी मुस्लिमांना आश्वासन दिले नाही का असा सवाल उद्धव ठाकरे यांनी उपस्थित केला, 
पाठीमागून वार करणारे आम्ही नाही. हुकूमशाही मोडण्याचा हा नक्षलवाद आहे का….लोकशाही वाचवणे हे आतंकवादी आहे का..तुमचा शासकीय नक्षलवाद सुरूय. लोकशाहीची हत्या करणारे तुम्ही नक्षलवादी आहात.  तुम्ही षंढ नसाल तर शिवसेनाप्रमुखांचा फोटो न वापरता व शिवसेना नाव न लावता फिरा…आम्ही बाळासाहेबांचा सोडून मी कुणाचाही फोटो वापरत नाही. मिंध्यांचा वडिलांचा फोटो लावून पुढे या…मोदी आतापासून विधानसभेचा प्रचार सुरू करा..या निवडणुकीत आपले परके कळाले.

भुजबळांबाबत ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी सर्व चर्चा फेटाळून लावल्या

भुजबळांशी शिवसेनेचा कोणताही राजकीय संवाद झालेला नाही…भुजबळांनी वेगळी भूमिका स्वीकारली असून, त्यांच्या भूमिकेशी शिवसेनेची भूमिका मेळ खात नाही…त्यामुळे भुजबळांना शिवसेनेत घेणार नसल्याचं राऊतांनी स्पष्ट केलंय…तर उद्धव ठाकरे नावाच्या डुबत्या जहाजात कोण जाईल…भुजबळ एवढी मोठी चूक करणार नाही असं नितेश राणेंनी म्हटलंय.

शिवसेना ठाकरे पक्षाचा 58 वा वर्धापन दिन मुंबईच्या षण्मुखानंद सभागृहात साजरा करण्यात आला. यावेळी ठाकरे गटाने निवडून आलेल्या सर्व खासदारांचा उद्धव ठाकरेंसह अनेक नेत्यांनी सात्कार केला. तसेच लोकसभा निवडणूकीत पराभूत झालेल्या सर्व उमेदवारांचा यावेळी सत्कार करण्यात आला.

हेही वाचा :

क्रिकेटर गुंतवले तब्बल 1400 कोटी, बनला उद्योजक, भारतात करतोय ‘हा’ बिझनेस

रक्तदाब नियंत्रित ठेवण्यासाठी आहारात ड्रायफ्रूट्सचा समावेश केल्याने, लवकर मिळेल आराम

सासूचा खून करून पोलीस ठाण्यात हजर जावयास जन्मठेप