दसऱ्यानंतर मुख्यमंत्री देणार आपल्या पदाचा राजीनामा? भाजप प्रदेशाध्यक्ष म्हणाले…

बंगळुरु : गेल्या काही दिवसांपासून राजकारणात(political consulting firms) विविध घडामोडी घडत आहेत. त्यातच दसऱ्यानंतर मुख्यमंत्री सिद्धरामय्या हे राजीनामा देतील, असा एकप्रकारे दावाच कर्नाटक भाजपचे प्रदेशाध्यक्ष बी. वाय. विजयेंद्र यांनी नुकताच केला आहे. ‘म्हैसूर अर्बन डेव्हलपमेंट अथॉरिटी जमीन वाटप प्रकरणात आरोप होत असलेले कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या दसऱ्यानंतर राजीनामा देऊ शकतात’, असे त्यांनी म्हटले आहे.

म्हैसूर अर्बन अथॉरिटी जमीन वाटप प्रकरणात सिद्धरामय्या यांच्या अडचणी वाढल्या आहेत. त्याच मुद्द्यावरून ते आपल्या मुख्यमंत्रिपदाचा(political consulting firms) राजीनामा देतील, असे विजयेंद्र यांनी म्हटले आहे. ते म्हणाले, ‘राज्यातील परिस्थिती अशी आहे की, मुख्यमंत्री सिद्धरामय्या रोजच मीडियासमोर स्पष्ट करत आहेत की, ते मुख्यमंत्रीच राहणार आहेत. त्यांची एवढी वाईट अवस्था आहे. सिद्धरामय्या मुख्यमंत्री राहतील, असा दावाही काही मंत्री करत आहेत.

तर दुसरीकडे सिद्धरामय्या यांनी सतीश जारकीहोळी यांना दिल्लीत पाठवले होते. सिद्धरामय्या हे राजीनामा देतील, असे विजयेंद्र यांनी पत्रकारांशी संवाद साधतााना म्हटले आहे. दरम्यान, राष्ट्रीय लोकशाही आघाडीचा घटक पक्ष असलेले जनता दल (धर्मनिरपेक्ष) नेते आणि केंद्रीय मंत्री एच. डी. कुमारस्वामी यांनी मुदतपूर्व मध्यावधी निवडणुका घेण्याबाबत विधान केलं होतं.

कुमारस्वामी यांनी कर्नाटकमध्ये विधानसभा निवडणुका लवकर होण्याची शक्यता व्यक्त केली आहे. काँग्रेस सरकारचे शेवटचे दिवस जवळ आले असून, पुढील निवडणुकांसाठी 2028 पर्यंत वाट पाहण्याची गरज नाही, असेही त्यांनी म्हटले आहे.

हेही वाचा :

रोडरोमियोंना कंटाळून 12 वर्षांच्या मुलीची आत्महत्या!

रतन टाटा यांची प्रकृती खालावली, मुंबईच्या ब्रीच कँडी हॉस्पिटलमध्ये दाखल

‘कोल्हापूर उत्तर’ जागा आमचीच… राजेश क्षीरसागर यांचा घुमजाव, ‘दक्षिण’वरही केला दावा; भाजपची कोंडी होणार?