हरियाणाचे मुख्यमंत्री सैनी बहुमत सिद्ध करणार?अधिवेशन बोलावण्याच्या तयारी

हरियाणातील भाजप सरकार राजकीय संकटात अडकल्याचं दिसत आहे (political news today). तीन अपक्ष आमदारांनी नायब सिंह सैनी सरकारचा पाठिंबा काढून घेतल्याने भाजप सरकार अल्पमतात आले आहे. दरम्यान, हरियाणा सरकार विधानसभेचे विशेष अधिवेशन बोलवू शकते, अशी बातमी समोर आली आहे. विधानसभेत सरकार बहुमत सिद्ध करेल, असा दावा माजी मुख्यमंत्री खट्टर यांनी केला आहे.

ते म्हणाले की, ”जेजेपीने हा मुद्दा उपस्थित करू नये, आता ते अडकले आहेत. कारण जेजेपीचे 6 आमदार आमच्या संपर्कात आहेत.” बहुमत चाचणीच्या काँग्रेसच्या मागणीवर कारवाई करत राज्यपालांनी प्रमुख विरोधी पक्षाकडून 30 आमदारांच्या स्वाक्षऱ्या असलेले पत्र मागवले आहे (political news today).

मनोहर लाल खट्टर यांनी दावा केला आहे की, काँग्रेसचे 30 पैकी 5 ते 6 आमदार आमच्यासोबत सामील होऊ शकतात. नुकतेच जेजेपी अध्यक्ष आणि माजी उपमुख्यमंत्री दुष्यंत चौटाला यांनी राज्यपालांना पत्र लिहून बहुमत चाचणीची मागणी केली होती. त्यांनी विधानसभेचे विशेष अधिवेशन बोलावण्याची मागणी केली होती. त्यांच्याशिवाय विरोधी पक्षनेते आणि माजी मुख्यमंत्री भूपिंदर सिंह हुड्डा यांनीही राज्यपालांना पत्र लिहून बहुमत चाचणीची मागणी केली होती. जेजेपी अध्यक्षांनी आपल्या पत्रात म्हटले होते की, राज्यात सरकार स्थापन करणाऱ्या कोणत्याही पक्षाला पाठिंबा देण्यास ते तयार आहेत.

दरम्यान, तीन अपक्ष आमदारांनी सरकारचा पाठिंबा काढून घेतल्यानंतर काँग्रेस अध्यक्ष उदय भान म्हणाले की, सध्या 90 जागांच्या हरियाणा विधानसभेत एकूण 88 आमदार आहेत. अशातच भाजप सरकार अल्पमतात आहे. कारण बहुमतासाठी आवश्यक असलेल्या 45 आमदारांपैकी त्यांच्याकडे केवळ 40 आमदार आहेत. भाजप सरकार अल्पमतात असल्याचा दावा काँग्रेसने केला. अशा परिस्थितीत राज्यपालांनी विधानसभेचे विशेष अधिवेशन बोलावून सरकारला बहुमत सिद्ध करण्याबाबत बोलायला हवं.

हरियाणात काँग्रेसचे 30 आमदार आहेत. त्यांना 3 अपक्ष आणि 10 जेजेपी आमदारांचा पाठिंबा मिळाल्यास ही संख्या 43 पर्यंत वाढेल. तर बहुमतासाठी 45 आमदारांची आवश्यकता असेल. अशातच काँग्रेसला इच्छा असूनही राज्यात सरकार स्थापन करता येणार नाही. मात्र यामुळेच राज्यात विधानसभा निवडणुका व्हाव्यात म्हणून काँग्रेस नेते राष्ट्रपती राजवटीची मागणी करत आहेत.