दिवाळीतही धो-धो बरसणार?, हवामान विभागाने दिला महत्वाचा इशारा
ऑक्टोबर महिना संपत आला मात्र, पावसाने अद्याप राज्यातून निरोप घेतला नाही. या दिवाळीतही पावसाचं(rain) संकट कायम राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. 28 आणि 29 ऑक्टोबर रोजी हवामान विभागाने पुन्हा मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. यामुळे शेतकरी दिवाळीच्या सणा-सुदीच्या काळातही चिंतेत पडला आहे.
मराठवाडा, विदर्भातील काही जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस(rain) पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तर, काही जिल्ह्यांत वातावरण कोरडे असून थंडीची चाहूल लागली आहे. वातावरणात होणाऱ्या या बदलामुळे आरोग्याच्या देखील समस्या उद्भवत आहेत.
दुसरीकडे, दाना चक्रीवादळाने काही राज्यात धुमाकूळ घातला आहे. महाराष्ट्रावर देखील त्याचा परिणाम होतोय. सध्या हे वादळ उत्तर ओडिसाच्या किनारपट्टीवर स्थित आहे. दरम्यान, राज्यात पुढील चार दिवस काही भागात पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.
मराठवाडा व विदर्भाच्या बहुतांश जिल्ह्यामध्ये मेघगर्जना व विजांचा कडकडाटासह पावसाचा अंदाज आहे. तर, तर पश्चिम महाराष्ट्रात देखील पावसाच्या सरी बरसतील. गेल्या काही दिवसात मुंबईसह कोकणात पावसाने पुन्हा एकदा जोरदार हजेरी लावली. आता दिवाळीला अवघे काही दिवस बाकी असून पावसासाठी पूरक वातावरण तयार होत असल्याचं चित्र काही ठिकाणी दिसून येतंय.
पुणे व आसपासच्या परिसरात पुढील तीन दिवस आकाश कोरडे राहण्याची शक्यता आहे. 28 ऑक्टोबर रोजी आकाश अंशतः ढगाळ राहून दुपारी किंवा संध्याकाळी हलक्या स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.
हेही वाचा :
PL 2025 पूर्वी MS Dhoni उतरणार निवडणुकीच्या मैदानात
ठाकरे गटाची दुसरी यादी जाहीर; भाजप-शिंदे गटाविरोधात दिले ‘हे’ तगडे उमेदवार
Hyundai चा प्लांट महाराष्ट्राच्या विकासाला मोठी गती देईल