मनोज जरांगे नव्या वर्षात करणार धमाका?, केली मोठी घोषणा
राठा आंदोलक मनोज जरांगे पाटील पुन्हा अॅक्टिव झाले आहेत. (new year)आज 17 डिसेंबर त्यांनी पत्रकार परिषद घेत मोठी भूमिका जाहीर केली. राज्यात पुन्हा एकदा महायुतीचे सरकार स्थापन झाले आहे. विधानसभेच्या निवडणुकीमुळे जरांगे यांनी आपलं आंदोलन मागे घेतलं होतं. आता निवडणुका झाल्या, निकालही लागले आणि सरकार देखील स्थापन झाले.अशात जरांगे यांनी पुन्हा आपल्या मागण्यासाठी उपोषणाची तयारी केली आहे.यावेळी त्यांनी कुणबी प्रमाणपत्राद्वारे मराठा आरक्षणाची मागणी पूर्ण करण्यासाठी पुन्हा एकदा आमरण उपोषणाला बसणार असल्याचं जाहीर केलंय. त्यांनी हे उपोषण कधी होणार, कुठे होणार याबाबतची सर्व माहिती पत्रकार परिषदेत दिली.
“सरकारला वाईट वाटेल, पश्चाताप होईल, इतकं भयंकर आणि मोठं आंदोलन उभा केलं जाईल. मराठा समाजाच्या एकजुटीने सरकारचे डोळे विस्फारतील”, असं जरांगे म्हणाले. त्यांनी राज्यभरातील मराठ्यांना अंतरवली-सराटीला एकत्र जमण्याचं आवाहन केलंय.“अंतरवली-सराटीत तुफान ताकदीने(new year) मराठ्यांनी एकत्र यायचं. एकाही मराठ्याने घरी थांबायच नाही, सर्वांनी इथे यायचं. “, असं जरांगे म्हणाले. येत्या 25 जानेवारीपासून ते अंतरवली सराटीत आमरण उपोषणाला बसणार आहेत. हे सामूहिक आमरण उपोषण असेल असं त्यांनी सांगितलं. ज्यांना स्वेच्छेने उपोषणाला बसायच आहे, ते बसू शकतात. पण कोणावरही जबरदस्ती नसेल असं, जरांगे यांनी स्पष्ट केलं.
“मराठा समाजाला आरक्षणाची गरज आहे. म्हणून मागच्या 15-16 महिन्यांपासून आंदोलन सुरु आहे. मराठ्यांची एकजूट कायम आहे. आरक्षण मिळेपर्यंत आंदोलन कायम (new year)राहणार आहे. मराठा समाज इतक्या ताकदीने एकजुटीने लढला, तरी अजून मराठा समाजाला सरसकट आरक्षण दिलेलं नाही.त्यामुळे पुन्हा उपोषण केलं जाईल”, असं जरांगे पाटील म्हणाले आहेत.
हेही वाचा :
थंडी परतणार! येत्या 24 तासात महाराष्ट्रातील वातावरण बदलणार
एक नाही तर तब्बल 9 आयपीओ खुले होणार; पुढील आठवड्यात कमाईची मोठी संधी!
‘विरोधी पक्षाचा पूर्ण सफाया, ६५ वर्षांत असं कधीच घडलं नाही…’, मविआ नेत्याचे सूचक वक्तव्य