संतोष देशमुख हत्या प्रकरण धनंजय मुंडेंना भोवणार?

बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांची 9 डिसेंबर रोजी(district 11) हत्या झाल्याची घटना घडली आहे. मात्र या घटनेमुळे संपूर्ण राज्यात खळबळ उडाली आहे. दरम्यान सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येमागे राजकीय कनेक्शन असल्याच्या चर्चाना उधाण आलं आहे. मात्र या धक्कादायक प्रकरणात बीडचे राजकीय नेते आणि मंत्री धनंजय मुंडे यांचे निकटवर्ती मानले जाणारे वाल्मिक कराड यांच्या नातेवाईकांचा हात असल्याचा आरोप केला जात आहेत.मात्र विधानसभा निवडणुकीनंतर अद्यापही महायुतीचे खातेवाटप झाले नाही. दरम्यान आता खातेवाटपापूर्वीच मंत्री धनंजय मुंडे हे सर्वपक्षीय नेत्यांच्या निशाण्यावर आले आहेत. परंतु, आता भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाकडून तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली आहे.

त्यामुळे आता बीड हत्याकांड प्रकरण मंत्री धनंजय मुंडेंना भोवणार असल्याची चर्चा सर्वत्र रंगली आहे.सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर अवघ्या काहीच दिवसात मंत्री धनंजय मुंडेंनी मंत्रिपदाची शपथ घेतली आहे. मात्र आता धनंजय मुंडेंचे नाव या हत्ये प्रकरणात वारंवार घेतलं जात आहे. कारण वाल्मिक (district 11) कराड हे धनंजय मुंडेंचे अत्यन्त जवळचे आहेत. याशिवाय विरोधी पक्षाने मागणी केली तरी देखील वाल्मिक कराडवर अद्याप कारवाई करण्यात आलेली आहे.

दरम्यान, आज या प्रकरणावर विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनादरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी कोणालाही सोडणार नसल्याचा थेट इशारा दिला आहे. तसेच जर वाल्मिक कराडचा यामध्ये देखील हात असेल तर त्याला देखील अटक करण्यात येणार आहे. मात्र आता या कारणामुळे मंत्री(district 11) धनंजय मुंडेंचे वाल्मिक कराडशी असलेले संबंध ही एक मोठी अडचण ठरु शकते.याशिवाय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकारमध्ये स्वच्छ, निष्कलंक चेहरे असावेत. त्यासाठी भारतीय जनता पक्षाचं नेतृत्त्व आग्रही देखील आहे. त्यामुळे आता धनंजय मुंडेंचे नाव येताच या प्रकरणात केंद्रीय नेतृत्वाने देखील तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

हेही वाचा :

पाणी प्रदूषणामुळे मिरजेतील गणेश तलावात ६०० किलो मासे मृत

हेल्मेट सक्तीबाबत महिलेचे विचित्र विधान; ऐकून पोलीसही झाले हैराण

थरकाप उडवणारी घटना; १५ वर्षीय मुलाच्या शरीराचे १७ तुकडे करून पुरले

केसांसोबत खिशाला कात्री लागणार