यंदाच्या विधानसभा निवडणुकीत शरद पवारांना यश मिळणार? ज्योतिषाचार्यांचं भाकित
यंदाच्या निवडणुकीकडे सर्वांचंच लक्ष लागलेलं आहे. शिवसेना, राष्ट्रवादी फुटीनंतर ही पहिलीच विधानसभा(assembly) निवडणूक होत आहे. या निवडणुकीत महायुती विरुद्ध महाविकास आघाडी असा थेट सामना पाहायला मिळणार आहे. आता प्रचाराच्या तोफा थंडावल्या असून महाराष्ट्राची जनता कोणाच्या हाती सत्ता देते, हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. 23 नोव्हेंबरला राज्याच्या राजकारणाचं चित्र स्पष्ट होणार असलं तरी एका प्रख्यात ज्योतिषींना याबद्दलचं भाकित आधीच केलं आहे. यानुसार, यंदाच्या निवडणुकीत शरद पवारांना यश मिळणार का?
शरद पवार हे बहुतेक लोकांसाठी गुरुस्थानी आहेत. स्वत: देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी शरद पवार यांना गुरू मानतात. त्या दोघांची लग्न रास वृश्चिक आहे, त्यामुळे त्या दोघांनाही प्रत्येक अडचणीवर मात करणं चांगलंच जमतं. शत्रूवर मात करण्याची कला त्यांच्या नसानसांत आहे. हे लोक माणसं पारखण्यात हुशार असतात, परंतु यांच्या मनात कधी काय चालतंय हे ओळखणं मात्र कुणालाच जमणार नाही. शरद पवारांचं वय झालं असलं तरी त्यांची जिद्द मात्र खचत नाही, त्यामुळेच आज या वयातही त्यांनी तुटलेला पक्ष नव्याने जोडला आहे. यातच वृश्चिक राशीची जिद्द दिसून येते.
शरद पवारांच्या पत्रिकेतील ग्रह त्यांच्यासाठी नेहमीच शुभ ठरतील. लग्न वृश्चिक रास, रवी-बुधाच्या नक्षत्रात, तर बुध षष्ठातील शनीच्या नक्षत्रात असल्याने पत्रिकेतील लाभेश आणि पराक्रमेश ही स्थानं खूपच प्रबळ झाली आहेत. त्यामुळे शरद पवार असो किंवा पंतप्रधान नरेंद्र मोदी, या व्यक्ती राजकारणात बराच काळ प्रसिद्धीच्या झोतात राहतात.
कितीही वय झालं तरी भारतातील राजकारण बदलण्याचं कसब शरद पवारांच्या हातून सुटत नाही. त्यामुळे लोकशाही जिवंत ठेवण्याची जबाबदारी शरद पवार याही वयात घेतील. सध्याचा सत्तेतील पक्षही त्यांच्या विचारांचा सन्मान करतो. यामुळेच पुढेही शरद पवारांच्या नेतृत्वातील पक्षाला यश मिळतच राहील.
विधानसभा(assembly) निवडणुकीच्या काळात रवीची बुधामध्ये अंतर्दशा असेल, जी 1 नोव्हेंबर 2025 पर्यंत राहील. रवी दशमेश लग्नस्थानी असल्याने यश आणि प्रसिद्धी या दोन्ही बाबी दिसून येतील. शरद पवारांची कुंडली पाहता, त्यांना या निवडणुकीतून मानसिक समाधान आणि अपेक्षित यश मिळेल हे नक्की.
(टीप : वरील सर्व बाबी केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा :
प्रचारसभा थंड होताच ‘खिशे’ झाले गरम, मध्यरात्री पडला पैशांचा पाऊस?
इलॉन मस्कला ट्रम्पचा पाठिंबा महागात पडतोय!
‘आप’ला धक्का! परिवहन मंत्र्याचा तडकाफडकी राजीनामा; पक्षालाही सोडचिठ्ठी