टीम इंडियाला थेट फायनलचं तिकीट मिळणार? समोर आली मोठी अपडेट

आयसीसी टी -२० वर्ल्डकप २०२४ स्पर्धेत भारतीय संघाचा(Team India) बोलबाला पाहायला मिळाला आहे. आतापर्यंत भारतीय संघाने या स्पर्धेतील एकही सामना गमावलेला नाही. साखळी फेरीतील ३ आणि सुपर ८ फेरीतील ३ सामने जिंकत भारतीय संघाने सेमिफायनलचं तिकीट मिळवलं आहे. अतिशय महत्वाच्या अशा सामन्यात भारतीय संघाने ऑस्ट्रेलियाला पाणी पाजलं. दरम्यान या विजयासह भारतीय संघाने सेमिफायनलचं तिकीट मिळवलं आहे.

आयसीसी टी-२० वर्ल्डकप(Team India) २०२४ स्पर्धेत आतापर्यंत अनेक उलटफेर पाहायला मिळाले आहेत. सुपर ८ फेरीतील सामन्यात अफगाणिस्तानने ऑस्ट्रेलियाचा धुव्वा उडवला. या विजयाचा भारतीय संघाला फायदा झाला. ऑस्ट्रेलिया, अफगाणिस्तान आणि बांगलादेशला पराभूत करून भारतीय संघ सध्या गुणतालिकेत अव्वल स्थानी आहे.

भारतीय संघ सध्या गुणतालिकेत अव्वल स्थानी आहे. त्यामुळे भारतीय संघाचा सामना ग्रूप १ मध्ये दुसऱ्या स्थानी असलेल्या इंग्लंडविरुद्ध होईल. तर दुसऱ्या सेमिफायनलमध्ये दक्षिण आफ्रिका आणि बांगलादेश हे दोन्ही संघ आमनेसामने येणार आहे. अफगाणिस्तानने करो या मरो लढतीत बांगलादेशला धूळ चारली आहे. भारतीय संघासाठी गुड न्यूज आणि इंग्लंडचं टेन्शन वाढवणारी बाब म्हणजे, या सामन्यावर पावसाचं सावट आहे.

आयसीसीने वेळापत्रक जाहीर केलं त्यावेळीच सेमिफायनलच्या सामन्यांबाबत अपडेट दिली होती. पहिल्या सेमिफायनलचा सामना २६ जून रोजी होणार आहे. या सामन्यात दक्षिण आफ्रिका आणि अफगाणिस्तानचा सामना होणार आहे. या सामन्यात जर पावसाने अडथळा निर्माण केला, तर २७ जून हा राखीव दिवस ठेवण्यात आला आहे.

भारतीय संघाचा सेमिफायनलचा सामना २८ जून रोजी इंग्लंडविरुद्ध होणार आहे. या सामन्यासाठी राखीव दिवस ठेवण्यात आलेला नाही. त्यामुळे सामना रद्द झाल्यास भारतीय संघ थेट फायनलमध्ये प्रवेश करेल. कारण भारतीय संघ गुणतालिकेत अव्वल आहे. त्यामुळे पावसामुळे सामना रद्द झाल्याचा फायदा हा भारतीय संघाला होणार आहे.

हेही वाचा :

भाजपच्या पदाधिकाऱ्यावर कोयत्याने हल्ला; हल्लेखोरांनी थेट अंगठाच तोडला

आज अंगारकीला जुळून आले अनेक शुभ योग; ‘या’ राशींना मिळणार कष्टाचं फळ

खासदारकीची शपथ घेताच कंगनाची गजब मागणी; मुख्यमंत्री शिंदेंची खोली द्या…