लाडक्या बहिणींचा महिला दिन होणार गोड या दिवशी मिळणार थेट 3000 रुपये

महायुती सरकारच्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेअंतर्गत 21 ते 65 (eligible)वयोगटातील पात्र लाभार्थी महिलांना दरमहा 1500 रुपये देण्यात येतात. जानेवारी पर्यंतचे आत्तापर्यंतच्या हप्त्यांचे पैसे महिलांच्या खात्यात जमा झाले आहेत. मात्र फेब्रुवारी महीना उलटून आता मार्च उलटला तरी फेब्रुवारीचे 1500 रुपये काही लाडक्या बहिणींच्या अद्याप खात्यात आलेले नाहीत. त्यामुळे फेब्रुवारीचे आणि आता मार्चचे पैसे, एकूण 3 हजार रुपये कधी मिळणार असा सवाल अनेक पात्र महिलांच्या मनात आहे. आता याबाबत मोठी अपडेट समोर आली आहे.

8 मार्च रोजी जागतिक महिला दिन असतो. त्याचत महिला दिनाच्या निमित्ताने महायुती सरकारने लाडक्या बहिणींना भेट देण्याचे ठरवले आहे. महिला दिनाच्या पूर्वसंध्येला लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसे जमा होणार असल्याची माहिती मिळत आहे. विशेष म्हणजे यावेळी महिलांना फेब्रुवारीचा तर हप्ता मिळणार आहेच, पण तेव्हाच त्यांच्या खात्यात मार्च महिन्याचाही हप्ता जमा होणार आहे. म्हणजेच पात्र लाडक्या बहिणींना फेब्रुवारी आणि मार्च अशा दोन्ही महिन्यांचे मिळून, एकूण 3 हजार रुपये, एकत्र मिळणाक आहे, असे समजते. त्यामुळे लाडक्या बहिणींचा महिला दिनही यंदा गोड होण्याची चिन्हे आहेत.

गेल्या वर्षी जुलै महिन्यात, तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी(eligible)सुरु केलेली ही योजना विधानसभा निवडणुकीत प्रचंड यशस्वी ठरली. या योजनेमुळे विधानसभा निवडणुकीत महायुतीला प्रचंड यश मिळाले. महायुतीला 232 जागा मिळाल्या. महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांना मिळून 50 जागाही मिळाल्या नाहीत.

विधानसभा निवडणुकीत महायुतीला पुन्हा निवडून दिल्यास लाडक्या बहिणींना 1500 रुपयांऐवजी 2100 रुपये देण्याचे आश्वासन जाहीरनाम्यात देण्यात आलं होतं. हे 2100 रुपये कधी मिळणार असाही सवाल अनेकांच्या मनात आहे. या अंमलबजावणीबाबत आमदार अनिल परब यांनी उपस्थित केलेल्या लक्षवेधीला उत्तर देताना महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी उत्तर दिलं.

राज्याचे मुख्यमंत्री किंवा उपमुख्यमंत्री यांनी अशी कोणतीही अधिकृत(eligible) घोषणा केलेली नाही. सरकार एखादी योजना जाहीर करते, तेव्हा जाहिरनामा हा 5 वर्षांचा असतो. अर्थसंकल्पात याबाबत निर्णय घेतला जाईल, मात्र सध्या 2100 रुपयांची कोणतीही घोषणा झालेली नाही. यामुळे लाडक्या बहिणांनी 2100 रुपये मिळण्यासाठी वाट पाहावी लागू शकते, अश माहिती समोर येत आहे. आदिती तटकरे यांच्या सभागृहातील वक्तव्याने लाडक्या बहिणींच्याी मोठी निराशा झाली आहे.

हेही वाचा :

चालय काय अल्पवयीन मुलीवर सामूहिक अत्याचार महाराष्ट्र घटनेनं हादरल

संतोष देशमुखांचे फोटो पाहून युवकाने केली आत्महत्या कुटुंबीयांना मोठा धक्का

‘या’ 3 तारखेला जन्मलेले लोक असतात भांडखोर; मात्र जोडीदाराची घेतात काळजी