ठाकरे गटात पुन्हा फूट पडणार? ‘या’ बड्या नेत्याचं खळबळजनक वक्तव्य
मुख्यमंत्र्यांच्या शपथविधीची तारीख आणि ठिकाण ठरल्याची माहिती चंद्रशेखर बावनकुळे(political news todays) यांनी काळ दिली आहे. यानुसार आता 5 डिसेंबरला नवीन मुख्यमंत्र्यांचा शपथविधी सोहळा पार पडणार आहे. अशातच आज संध्याकाळी मुंबईमध्ये महायुतीची बैठक होणार आहे. मात्र त्यानंतर अनेक गोष्टी समोर येणार आहेत. परंतु, आता शिवसेना शिंदे गटाचे नेते गुलाबराव पाटील यांनी एक खळबळ वक्तव्य केलं आहे.
गुलाबराव पाटील यांनी उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे आमदार(political news todays) फुटणार असल्याचा दावा केला आहे. कारण आदित्य ठाकरे हा तोंडात सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आलेला माणूस आहे. कारण आंदोलन करून आज आम्ही त्यांना मोठं केलं आहे, अन्यथा आज ज्यांनी शिवसेनेला मोठे केले ते लोक कुठे आहेत, हे संजय राऊत यांना विचारा असा टोला त्यांनी लगावला आहे.
यावेळी ते म्हणले की, दिवाकर रावते कुठे आहेत, लीलाधर ढाके कुठे आहेत. तसेच महाडिकांच नाव कधी घेतलं जातं नाही. या सर्वांना उद्धव ठाकरे विसरले आहेत. तसेच त्या महालामध्ये आमच्यासारख्याची सुद्धा एक वीट असल्याचं ते म्हणाले आहेत. परंतु या सर्वांना विसरले म्हणून उद्धव ठाकरे हे संजय राऊत सारखा एक दगड घेऊन आले असा घणाघात गुलाबराव पाटील यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर केला आहे.
यासंदर्भात गुलाबराव पाटील माहिती देताना म्हणाले की, मुख्यमंत्री पदावरून एकनाथ शिंदे यांना विचारलं त्यावेळी त्यांनी सांगितलं की कुठली अडचण होईल अशा पद्धतीचा भाकीत मी करणार नाही. कारण पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांचा जो निर्णय घेतील त्या निर्णयाला माझा 100% पाठिंबा असणार आहे.
अशातच आता महायुती सरकारचा शपथविधी हा 5 डिसेंबर रोजी होणार आहे. मात्र उद्या 2 डिसेंबर रोजी भाजपच्या गटनेत्याची निवड होणार आहे. त्यानंतर 5 डिसेंबर रोजी मुख्यमंत्री शपथ ग्रहण करणार असल्याचा दावा गुलाबराव पाटील यांनी केला आहे.
हेही वाचा :
‘पिक्चर अभी बाकी है’; युगेंद्र पवारांची मोठी मागणी, अजित पवार अडचणीत?
दीपक केसरकर एकनाथ शिंदेंना भेटायला गेले अन् भेट न होताच परतले
BSNL धमाकेदार प्रीपेड प्लॅन, परवडणाऱ्या किंमतीत मिळणार 160 दिवसांची व्हॅलिडीटी आणि बरचं काही
अर्रर्र! भर रस्त्यात विद्यार्थीनींमध्ये जोरदार राडा; एकमेकींना धु, धु धुतले, VIDEO व्हायरल