लाडक्या बहिणींना 2100 रुपये देणार? अजित पवार अर्थसंकल्पात कोणत्या घोषणा करणार?

राज्याचा अर्थसंकल्प आज सादर होणार आहे. दुपारी २ वाजता विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात हा अर्थसंकल्प(Budget) मांडला जाणार आहे. उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार हे विधानसभेत अर्थसंकल्प मांडणार आहेत. अर्थसंकल्पातून सर्वसामान्यांच्या कोणत्या अपेक्षा पूर्ण होणार? याबाबत उत्सुकता आहे.

अर्थमंत्री अजित पवार 11 व्यांदा अर्थसंकल्प(Budget) मांडणार आहेत. तर अर्थ राज्यमंत्री आशिष जयस्वाल हे विधान परिषदेत अर्थसंकल्प मांडतील.विधानसभा निवडणुकीतील विजयानंतरचा महायुती सरकारचा हा पहिलाच अर्थसंकल्प आहे. निवडणूक काळात दिलेल्या भरमसाठ आश्वासनांपैकी कोणती आश्वासनं या अर्थसंकल्पाच्या माध्यमातून पूर्ण होतायत याकडे सर्वांचं लक्ष आहे.
लाडकी बहिणींना 2100 रुपये देण्याची घोषणा होणार का याकडे राज्याचं लक्ष लागलं आहे. लाडकी बहिण योजनेवर सरकारचा मोठा खर्च होत असल्याने विकास कामांसाठी लागणारा निधी कमी पडतोय. त्यातच आर्थिक पाहणी अहवालात राज्य सरकारची आर्थिक स्थिती फारशी चांगली नसल्याचं दिसून आलंय. महसुली उत्पन्नापेक्षा महसुली खर्च जास्त आहे,कर्जफेड आणि व्याजावर मोठी रक्कम खर्च होत आहे. परिणामी अर्थसंकल्पातून मोठ्या घोषणा होण्याची शक्यता कमीच दिसतेय.
उपमुख्यमंत्री अजित पवार हे आज त्यांचा अकरावा अर्थसंकल्प सादर करतील. त्यानंतर ते श्री. शेषराव वानखेडे यांच्यानंतर (१३ वेळा) दुसरे सर्वाधिक (११) वेळा अर्थसंकल्प सादर करणारे अर्थमंत्री ठरतील. शेषराव वानखेडे यांनी 13 वेळा, अजित पवार यांनी आजचा अर्थसंकल्प धरून 11 वेळा, त्यांच्यानंतर सर्वाधिक वेळा अर्थसंकल्प सादर करण्याचा मान श्री. जयंत पाटील (10 वेळा) आणि श्री. सुशीलकुमार शिंदे (9 वेळा) यांना जातो.
राज्याचा आर्थिक पाहणी सर्वेक्षण अहवालानुसार राज्यासमोर आर्थिक संकट वाढले आहे. महसुली उत्पन्नापेक्षा खर्च जास्त झाला आहे. तर कर्ज आणि व्याजापोटी मोठी रक्कम खर्च होत असल्याचे समोर
कर्ज आणि व्याजापोटी मोठी रक्कम होतंय खर्च. भांडवली खर्चासाठी दुसरे कर्ज काढण्याशिवाय पर्याय नाही असं दिसून येतेय.
महत्त्वाचे मुद्दे
- २०२४-२५ साठी राज्याची महसुली जमा ४ लाख ९९ हजार ४६३ कोटी रुपये अपेक्षित तर महसुली खर्च ५ लाख १९ हजार ५१४ कोटी अपेक्षित
- कर, महसूल आणि करेतर महसूल (केंद्रीय अनुदानासह) अनुक्रमे ४ लाख १९ हजार ९७२ कोटी आणि ७९ हजार ४९१ कोटी अपेक्षित
- २०२४-२५ मध्ये जानेवारी पर्यंत प्रत्यक्ष महसुली जमा ३ लाख ८१ हजार ८० कोटी रुपये ही रक्कम अर्थसंकल्पीय अंदाजाच्या ७६.३ टक्के आहे.
- अर्थसंकल्पीय अंदाजानुसार २०२४-२५ करिता राज्याचा महसुली खर्च ५ लाख १९ हजार ५१४ कोटी अपेक्षित आहे
- स्थूल राज्य उत्पन्नाच्या तुलनेत कर्ज आणि व्याजापोटी १७.३ टक्के रक्कम खर्च होतंय
- सन २०२४-२५ च्या अर्थसंकल्पीय अंदाजानुसार राजकोषीय तूट २.४ टक्के, महसुली तुट ०.४ टक्के
हेही वाचा :
गुड न्यूज! लालपरीचं LIVE लोकेशन कळणार थेट मोबाइलवर
पाण्याची टाकी साफ करताना ५ सफाई कर्मचाऱ्यांचा गुदमरून मृत्यू
घटस्फोटानंतर युजवेंद्र चहलच्या नव्या प्रेमाची चर्चा? दुबईत ‘या’ मिस्ट्री गर्लसोबत दिसला!