लग्नाच्या काही महिन्यातच सोनाक्षी नवऱ्याला त्रासली?, धक्कादायक खुलासा समोर
बॉलीवुड अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा झहीर इक्बालसोबत लग्न(marriage) बंधनात अडकली आहे. गेल्या अनेक वर्षांपासून एकमेकांना डेट केल्यानंतर या स्टार कपलने एकदम खासगी पद्धतीने लग्नाची नोंदणी केली. सोनाक्षी आणि झहीर यांच्या लग्नाला आता तीन महीने उलटून गेले आहेत.
सोनाक्षीला झहीरसोबत लग्न(marriage) केल्यानंतर प्रचंड ट्रोल करण्यात आले होते. झहीर इक्बाल याच्यावर ‘लव्ह जिहाद’ सारखे आरोप देखील करण्यात आले होते. मात्र, या सर्व ट्रोलिंगकडे दुर्लक्ष करत सोनाक्षीने लग्न केलं. तिच्या लग्नात तिचे कुटुंबीय नाराज असल्याचं देखील मागे म्हटलं गेलं. अशात सोनाक्षी आणि झहीर यांच्या नात्याबाबत एक मोठा खुलासा समोर आला आहे.
नुकत्याच झालेल्या एका मुलाखतीमध्ये सोनाक्षी आणि झहीर यांनी त्यांच्या नात्याबद्दल मोठा खुलासा केला. दोघांनीही एकमेकांच्या आवडी-निवडींबद्दल खुलासा केला. दोघांना मुलाखतीमध्ये एकमेकांच्या चांगल्या वाईट सवयींबद्दल विचारण्यात आलं. यावर झहीरने दिलेली प्रतिक्रिया चर्चेत आली आहे.
“सोनाक्षीमध्ये अशा फार कमी गोष्टी आहेत, ज्या मला आवडत नाहीत. सोनाक्षी जरा अधिकच वक्तशीर आहे. वक्तशीर असणे महत्वाचे आहे, परंतु काहीवेळा थोडा उशीर होणं देखील मान्य आहे.”, असं झहीर म्हणाला. तसेच, सोनाक्षीबद्दल आवडती गोष्ट म्हणजे तिची नम्रता आणि साधेपणा, असं झहीर म्हणाला.
सोनाक्षीने देखील नवऱ्याचे कौतुक केले. “झहीर मोठ्या मनाचा व्यक्ती आहे. झहीर फक्त त्याच्या कुटुंबियांसाठी दयाळू नाही तर, आजू- बाजूच्या सर्व लोकांना तो सन्मान देतो. मला त्याचा स्वभाव फार आवडतो.”, असं सोनाक्षी म्हणाली. यावेळी सोनाक्षीने झहीरच्या वाईट सवयीबद्दल देखील सांगितलं.
“झहीर प्रचंड गोंधळ घालत असतो. सतत शीटी वाजवत असतो… आवाज करत असतो… त्याच्या आवाजामुळे मी शांततेच्या शोधात असते.”, असं सोनाक्षी म्हणाली. त्यावर झहीर म्हणाला की, “सोनाक्षी अतिशय नम्रपणे वागते आणि म्हणते, कृपया घर सोडून जा तू”, आता झहीरचं हे विधान चर्चेत आलं आहे. दरम्यान, सोनाक्षी आणि झहीर यांनी 23 जून 2024 मध्ये लग्न केलं. जवळपास 7 वर्ष एकमेकांना डेट केल्यानंतर दोघांनी लग्न करत संसार थाटला. सध्या दोघांची ही मुलाखत चर्चेत आली आहे.
हेही वाचा :
रक्षकच बनले भक्षक! पोलिसांकडून तरुणीचा विनयभंग
भविष्यात ‘या’ पाच स्टॉक्समध्ये गुंतवा अन् टेन्शन फ्री व्हा!
निर्मला सीतारामण यांच्यावर खंडणी प्रकरणी न्यायालयाचे गुन्हा दाखल कऱण्याचे आदेश