खासदार नारायण राणेंच्या नावाचा वापर करुन महिलेला घातला गंडा; लाखोंची फसवणूक

रत्नागिरी : भाजपचे नेते, महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि खासदार नारायण राणे यांचे नाव वापरुन फसवणूकीचा प्रकार झाला आहे. खासदार राणेंचा नावाचा वापर करुन एका महिलेची(Woman) अर्थिक फसवणूक करण्यात आली.

सदर महिलेला लाखो रुपयांचा गंडा घालण्यात आली आहे. याप्रकरणी पीडित महिलेने(Woman) वर्सोवा पोलिस स्टेशनमध्ये धाव घेत तक्रार नोंदवली. त्याची गंभीर दखल घेत पोलिसांन याप्रकरणी चार जणांविरोधात गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू करण्यात आला आहे.
मीडिया रिपोर्टनुसार, खासदार नारायण राणे यांचे नाव घेऊन फसवणूक झालेली महिला अंधेरीची आहे. ही पीडित महिला 51 वर्षीय असून एका खासगी रुग्णालयात वैद्यकीय सहाय्यक म्हणून काम करत आहे. त्यांना 23 वर्षांची मुलगी असून तिने ऑक्टोबर 2020 साली नीट परीक्षेत 315 गुण मिळवले होते.
सध्या ती मुलगी बंगळुरूमध्ये बीएचएमएसच्या पहिल्या वर्षात शिकत आहे. पीडित महिला ही मार्च 2021 मध्ये त्यांच्या मुलीसाठी वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश घेण्यासाठी प्रयत्न करत होत्या. तेव्हाच त्यांची भेट त्यांची जुनी मैत्रिण मेघना सातपुते हिच्याशी झाली.
या घटनेमध्ये मेघना सातपुते यांनी तक्रारदार महिलेची, नितेश पवार व राकेश गावडे यांच्याशी ओळख करून दिली. ते दोघे सिंधुदुर्गातील एका वैद्यकीय शाळेचे विश्वस्त असल्याची बतावणी त्यांनी यावेळी केली. तुमच्या मुलीला व्यवस्थापन कोट्यातून वैद्यकीय महाविद्यालायत प्रवेश मिळवून देतो, असे आमिष त्यांनी तक्रारार महिलेला दाखवले, आणि त्यासाठी 15 लाख रुपये मागितले. पीडित महिलेने ते पैसे दिले खरे, पण त्यानतंरही तिच्या मुलीला काही प्रवेश मिळाला नाही.
कोरोनामुळे लॉकडाऊन लागला, त्यामुळे आता सर्व नियम बदल्यामुळे प्रवेशासाठी आणखी पैसे लागतील, असे सांगत त्या लोकांनी तक्रारदार महिलेकडून तब्बल 45 लाख रुपये उकळले. त्यानंतरही डिसेंबर 2021 मध्ये कॉलेज सुरू होईल असे सांगण्यात आले. पण महिलेला किंवा तिच्या मुलीला कोणतेही पेपर्स, ॲडमिशनचे पत्र वगैरे काहीच दिले नाही. त्यांचं वागणं पाहून महिलेला संशय आला, आणि तिने संबंधित कॉलेजशी संपर्क साधून चौकशी केली. मात्र तिच्या मुलीला कॉलेजमध्ये प्रवेशच मिळाला नसल्याचे तेव्हा स्पष्ट झाले आणि त्या महिलेला मोठा धक्का बसला.
त्यावेळी तक्रारदार महिलेने आरोपींशी संपर्क साधण्याचा खूप प्रयत्न केला, पण त्यांच्याशी काहीच कॉन्टॅक्ट झाला नाही, त्यांचे मोबाईलही बंद होते. अखेर आपली फसवणूक झाल्याचे महिलेच्या लक्षात आलं आणि तिने वर्सोवा पोलिस स्टेशनमध्ये धावे घेत तक्रार दाखल केली. त्या आधारे पोलिसांनी मेघना सातपुते, नितेश पवार, सावंत काका आणि राकेश गावडे या चौघांविरोधात गुन्हा दाखल केला असून त्यांचा कसून शोध घेतला जात आहे. अशा प्रकारे अंधेरीतील महिलेची फसवणूक करण्यात आली आहे.
हेही वाचा :
मोठी बातमी! हिंदी-मराठी वाद पेटला, मनसे कार्यकर्त्यांनी एअरटेलच्या कर्मचाऱ्याला बेदम चोपलं
कसोटीदरम्यान टीम इंडियाला मोठा धक्का, बुमराह चालू सामन्यातच स्टेडियमबाहेर
प्रियकरावरून तरुणींनी भररस्त्यात घातला राडा, एकमेकींचे कपडे फाडले अन्…Video Viral