गाडीची महिलेला धडक पण दुपट्ट्यामुळे वाचला जीव व्हिडिओ व्हायरल
वेगाने वाहन चालवण्यासाठी लोक इतरांचा जीव धोक्यात घालतात. (saved)वेगाची आवड अशी आहे की, स्वत:ला ‘हेवी ड्रायव्हर’ समजणारे हे लोक अरुंद गल्ल्या आणि निवासी भागातही गाडीच्या ॲक्सिलेटरवरून पाय काढत नाहीत. अशा परिस्थितीत अनेकवेळा वाहन नियंत्रणाबाहेर गेल्याने भीषण अपघात घडून येतात. सोशल मीडियावर येत्या काळात अपघातांचे अनेक व्हिडिओज शेअर झाले आहेत. सध्या अशाच एका अपघाताचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यामध्ये एक वाहन अचानक एका महिलेच्या दिशेने जात असल्याचे दिसून येते मात्र पुढे जे घडते ते सर्वांना थक्क करून टाकते.
व्हायरल व्हिडिओमध्ये जर आपण पाहिले तर यात एका अपघाताचे दृश्य दिसून येते. यात आपल्याला एक महिला रस्त्याने चालताना दिसत आहे. यावेळी अचानक समोरून एक चारचाकी भरवेगात येते आणि महिलेच्या बाजूने जात पुढे जाऊन एका रस्त्यावर उलटी पडते. यावेळी ही गाडी महिलेच्या जवळून जाते मात्र तिला काहीच होत नाही तर फक्त तूच दुपट्टा या गाडीसह ओढला जातो. भरधाव वेगाने येणारी कार तिचा दुपट्टा (saved)सोबत घेऊन रस्त्यावर आदळते आणि पलटी होते. खरं तर, हा क्षण असा आहे की पाहणाऱ्याचे हृदय वेगाने धडधडू लागते.’
या घटनेबाबत सोशल मीडियावर लोक वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. काही जण याला ‘फायनल डेस्टिनेशन’ चित्रपटातील सीन म्हणत आहेत, तर काहीजण हा केवळ नशिबाचा खेळ मानत आहेत. ही घटना केव्हा आणि कुठे घडली याबाबत सध्या तरी कोणतीही अधिकृत माहिती मिळालेली नाही. मात्र व्हिडिओतील अपघाताचा हा थरार पाहून अनेकांचे हृदय काही वेळासाठी तरी सुन्न होऊन बसले. लोक हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात पाहात आहेत आणि शेअर देखील करत आहेत.
फाइनल डेस्टिनेशन लेवल का वीडियो , मौत आई बस दुपट्टा लेकर चली गई pic.twitter.com/1acDLnDJmX
— Byomkesh December 17, 2024
अपघाताचा हा व्हिडिओ नावाच्या एक्स अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये, ‘फाइनल डेस्टिनेशन लेव्हलचा व्हिडिओ, मृत्यू आला आणि दुपट्टा घेऊन निघून गेला’ असे लिहिण्यात आले आहे. व्हिडिओला 50 हजाराहून अधिक लोकांनी पाहिले आहे तर अनेकांनी यावर कमेंट्स करत या घटनेवर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे, “दुपट्टा ओढण्याचा केस(saved) बनतो यावर” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “यमराजाला घाम पुसण्यासाठी दुपट्टा हवा असेल”.
हेही वाचा :
सोन्याच्या दरात आज पुन्हा झाली घट; काय आहेत 22,24,18 कॅरेटचे भाव, जाणून घ्या
राष्ट्राध्यक्षांच्या खुर्चीवर बसण्याआधीच डोनाल्ड ट्रम्प यांची भारताला धमकी
एकनाथ शिंदेंकडे गृहनिर्माण, अजित पवारांकडे अर्थ; देवेंद्र फडणवीसांकडे कोणतं खातं?