हेल्मेट सक्तीबाबत महिलेचे विचित्र विधान; ऐकून पोलीसही झाले हैराण

दुचाकी चालवताना हेल्मेट वापरणं हे बंधनकारक आहे. अन् जर तुम्ही या नियमाचं(motorcycle helmets) उल्लंघन केलं तर तुम्हाला १ हजार रुपयांपर्यंतचा दंड आकारला जाऊ शकतो. त्यामुळे बाईक चालवताना हेल्मेट घालणं विसरू नका. पण पुण्यातील एका वाटतेय हेल्मेट सक्ती ही केवळ पुरूषांना असावी. महिलांना हेल्मेटची गरज नाही. बरं, आपला विचार व्यक्त तिनं जी काही कारणं दिली आहेत ती पाहून खरंच तुम्हाला हसू आवरणार नाही. तुमचं डोकं सुद्धा चक्रावून जाईल. कमेंट सेक्शनमध्ये महिलाच म्हणताहेत, ‘असा स्त्रीयांमुळे महिलांना मूर्ख समजलं जातं.’ हा व्हिडीओ पाहा अन् आता तुम्हीच सांगा अशा महिलांना हेल्मेटचा उपयोग समजवायचा तरी कसा?हा व्हिडीओ या इन्स्टाग्राम पेजवरून शेअर करण्यात आला आहे.

या व्हिडीओमध्ये तुम्ही एका महिला रिपोर्टरला पाहू शकता जी एका पुणेकर महिलेला हेल्मेट सक्तीबाबत सवाल करत तिचं मत जाणून घेण्याचा प्रयत्न करतेय. पण महिलेनं या मुलाखतीत जे काही विचार व्यक्त केले आहेत ते पाहून खरंच तुम्ही डोक्याला हात लावाल.ती म्हणाली, “महिलांना हेल्मेट सक्ती करू नये. कारण महिलांच्या मागे खूप व्याप असतात. मुलांची शाळा असते, नवऱ्याचं ऑफिस असतं, घरातील वृद्ध मंडळींची(motorcycle helmets) सेवा करावी लागते. अन् या सर्व कामांचा ताण त्यांच्यावर असतो. त्यामुळे त्यांना हेल्मेट सक्ती करू नये. त्या ऐवजी महिलांना जास्तीत जास्त सुविधा कशा देता येतील. लाडकी बहिण योजनेचे पैसे कसे वाढवता येतील याकडे सरकारनं लक्ष द्यावं. पुरूषांना हेल्मेटची गरज आहे पण महिलांना हेल्मेटची गरज नाही.” तिनं दिलेलं हे उत्तर सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

आतापर्यंत २५ हजारांपेक्षा अधिक नेटकऱ्यांनी पाहिला असून अनेकांनी त्यावर विविध प्रतिक्रिया दिल्या आहेत. कोणी म्हणतेय असे विचार व्यक्त करण्यासाठी या ताईंचा सत्कार करा. तर(motorcycle helmets) कोणी म्हणतेय, म्हणून महिलांना मूर्ख मानलं जातं. काही जणांच्या मते या महिलेला डोकंच नाहीये तर तिला हेल्मेटची काय गरज? असो, हे उत्तर ऐकून तुम्हाला काय वाटलं? तुम्ही देखील आपल्या प्रतिक्रिया द्या.

हेही वाचा :

झोपा कामावर आणि नोकरी गमवा? न्यायालयाचा ठोस निर्णय

वर्षाच्या शेवटी सोन्याची आनंदवार्ता, ‘इतक्या’ रुपयांनी घसरले भाव

निवडणूक होताच प्रवाशांना पहिला झटका, लालपरीचा प्रवास महागणार?