वाल्मिक कराडसाठी महिलांनी अंगावर पेट्रोल ओतून आत्मदहनाचा केला प्रयत्न!

बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील मुख्य संशयित आरोपी वाल्मिक कराडची मोक्का अंतर्गत कारवाई(Action) होणार आहे. तसेच आज वाल्मिक कराडच्या न्यायालयीन(कोठडीत 14 दिवसांची वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे आज परळीत वाल्मिक कराडच्या समर्थनासाठी कार्यकर्ते रस्त्यावर उतरले आहेत.

खंडणी प्रकरणात अटकेत असलेला आरोपी वाल्मिक कराड (Action)याच्या समर्थनासाठी परळी शहरामध्ये जोरदार आंदोलन सुरू झालं आहे. आता कार्यकर्ते थेट रस्त्यावर उतरले आहेत, तसेच यावेळी महिला देखील मोठ्या प्रमाणात आक्रमक झाल्या असून त्यांनी अंगावर पेट्रोल टाकून आत्मदहनाचा प्रयत्न केला आहे.

याशिवाय वाल्मिक कराडच्या काही समर्थकांनी थेट पाण्याच्या टाकीवर चढून देखील आंदोलन केलं आहे. तसेच या आंदोलना दरम्यान एका आंदोलकाला चक्कर आल्याची देखील घटना घडली आहे. त्यामुळे आता परळीत वाल्मिक कराडच्या समर्थनार्थ प्रचंड गदारोळ माजला आहे.

वाल्मिक कराडवर मोक्का अंतर्गंत कारवाई करण्यात आल्यानं आता परळीमधील त्याचे समर्थक मोठ्या प्रमाणात आक्रमक झाले असल्याने त्यांनी परळी बंदची हाक दिली आहे. मात्र आज परळीमध्ये सर्व दुकानं बंद करण्यात आले आहेत, त्यामुळे सर्वत्र शुकशुकाट पाहायला मिळत आहे. याशिवाय आंदोलक देखील प्रचंड आक्रमक झाले आहेत.

दरम्यान, सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मुख्य संशयित आरोपी वाल्मिक कराडवर मोक्का लावण्यात आला आहे. तसेच वाल्मिक कराडच्या न्यायालयीन कोठडीत देखील 14 दिवसांची वाढ करण्यात आली आहे.

हेही वाचा :

महिंद्रांकडून नववर्षात सर्वात मोठं गिफ्ट, तब्बल 4500 कोटी…

काही सेकंदातच श्वानाने बिबट्याला टाकलं फाडून, मृत्यूचा थरार अन् Video Viral

सांगली-कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना चौपट मोबदला मिळावा, अन्यथा भूसंपादन होऊ देणार नाही – राजू शेट्टी