महिला ट्वेन्टी-२० विश्वचषकाचे आयोजन बदलले: बांगलादेशाऐवजी अमिरातीत रंगणार स्पर्धा

आंतरराष्ट्रीय क्रिकेट(cricket)परिषदेने (आयसीसी) बांगलादेशातील अस्थिर परिस्थितीमुळे महिला ट्वेन्टी-२० विश्वचषक स्पर्धेचे आयोजन संयुक्त अरब अमिराती (यूएई) येथे हलवण्याचा निर्णय घेतला आहे. या स्पर्धेचे आयोजन ३ ते २० ऑक्टोबर या कालावधीत दुबई आणि शारजा येथे होणार आहे.

आयसीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी जेफ अॅलर्डाइस यांनी या निर्णयावर खेद व्यक्त केला, परंतु अमिरातीत स्पर्धा यशस्वी होईल असा विश्वास व्यक्त केला. बांगलादेशातील माजी पंतप्रधान शेख हसीना यांच्या विरोधातील नागरिकांच्या आंदोलनांमुळे तेथील सुरक्षेची परिस्थिती गंभीर बनली आहे, ज्यामुळे हे पाऊल उचलावे लागले.

स्पर्धेचे आयोजन भारतात करण्याची आयसीसीची इच्छा होती, परंतु बीसीसीआयचे सचिव जय शहा यांनी हा प्रस्ताव नाकारल्यानंतर श्रीलंका आणि झिम्बाब्वेने आयोजनाची तयारी दर्शवली होती. तरीही, आयसीसीने यजमानपद अमिरातीला दिले आहे, आणि बांगलादेशात भविष्यात स्पर्धा आयोजित करण्याच्या आशा व्यक्त केल्या आहेत.

हेही वाचा :

शक्तिपीठ महामार्गाच्या संरेखनात बदल: शेतकऱ्यांच्या आक्षेपानंतर एमएसआरडीसीकडून नवा आराखडा तयार

श्रावण महिन्यात मांसाहार का टाळावा? जाणून घ्या शाकाहारी आहाराचे वैज्ञानिक फायदे

२२ वर्षीय तरुणाची आधुनिक शेतीतील क्रांती: एरोपोनिक्स तंत्राने केशर लागवड करून बनला लाखोपती