आयुष्याला कंटाळला कामगार, इमारतीच्या 13 मजल्यावरून मारली उडी Video Viral

मुंबईतील सध्या एका धक्कादायक घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. यात एक कामगार आपला घेण्याच्या प्रयत्न करताना दिसून येत आहे. हा व्यक्ती मानसिक तणावात असल्याची बातमी समोर आली आहे, ज्यामुळे त्याने बिल्डिंगच्या(building) 13 मजल्यावरून उडी मारत स्वतःला संपवण्याचा प्रयत्न केला.

मुख्य म्हणजे, हा त्याचा पहिलाच प्रयत्न नव्हता तर त्याने याआधीही स्वतःला संपवण्याचा प्रयत्न केला होता मात्र त्यात यश न आल्याने त्याने दुसऱ्यांना हा प्रयत्न केला. या थरारक घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून लोक यातील दृश्ये पाहून हादरली आहेत.

आपला जीव हा फार मोलाचा असतो मात्र आजकालच्या महागाईच्या धावपळीच्या आयुष्यात लोकांनी स्वतःवर आणि इतरांवर लक्ष देणे फार कमी केले ज्यामुळे अनेकांमध्ये मानसिक ताण निर्माण होत आहे. अनेकदा यामुळे लोक डिप्रेशनमध्ये जातात आणि मग त्यांना आयुष्य जगण्यात रस वाटत नाही.

मानसिक तणावामुळे अनेकजण आपले आयुष्य संपवत आहेत. या अशा घटना नेहमीच बातम्यांमधून समोर येत असतात. तर नुकताच व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्येही असेच काहीसे घडल्याचे दिसून आले आहे. आश्चर्याची बाब म्हणजे, या घटनेत व्यक्तीने या घटनेत व्यक्तीला काहीच झाले नाही आणि सुखरूप यातून बाहेर आला. नक्की काय घडले ते जाणून घेऊयात.

माहितीनुसार, या कामगाराचे नाव बिरजूप्रसाद रमेश बनरवा असे आहे. जीव देण्याच्या प्रयत्नातून बचावल्यानंतर त्याला त्याच्या उत्तरप्रदेशमधील गोरखपूर गावी पाठविण्यात आले आहे. तो काही दिवसांपासून मानसिक तणावात होता. या तणावामुळे तो इतका त्रस्त झाला की त्याने आपला जीव संपवण्याचा विचार केला. यासाठी काल तो काम करत असलेल्या 57 क्रमांकाच्या इमारतीच्या(building) तेराव्या मजल्यावर गेला तिथून त्याने खाली उडी मारली.

मात्र सुदैवाने यात त्याला काहीही झाले नाही कारण उडी मारताच तो थेट आठव्या मजल्यावर लावण्यात आलेल्या जाळीत जाऊन अडकला. तिथून ही त्याने उडी मारली तर तिसऱ्या मजल्यावरील जाळीत अडकला. तिथून उडी मारल्यावर खाली लोकांनी पकडलेल्या जाळीत पडला आणि त्याचा जीव वाचला. शेवटी म्हणतात ना, ‘देव तारी त्याला कोण मारी’, या घटनेत याचे उत्तम उदाहरण दिसून आले.

सदर घटनेचा थरारक व्हिडिओ @VishooSingh नावाच्या एक्स अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये, ‘कन्नमवार नगर येथील एका चमत्कारिक घटनेत बांधकाम कामगाराने बांधकाम सुरू असलेल्या इमारतीच्या 13 व्या मजल्यावरून उडी मारल्याने तो बचावला. शेवटी ग्राउंड लेव्हल जाळ्यात अडकण्यापूर्वी कामगार 8व्या आणि 3ऱ्या मजल्यावर बसवलेल्या सुरक्षा जाळ्यांवर उतरला’ अशी घटनेविषयीची सविस्तर माहिती देण्यात आली आहे.

हेही वाचा :

आता नवीन Sim Card खरेदी करणं होणार कठीण, शासनाने दिला आदेश

कुठेही कधीही होईल लघवी; पाणी शोषून घेणं बंद करेल Kidney, ब्लॅडर सडवू शकतात 5 ड्रिंक्स

अदानींना धक्का देणाऱ्या हिंडेनबर्गला टाळं; कंपनीच्या संस्थापकानेच केली घोषणा