जगाचा विनाश, मोठं युद्ध आणि…; बाबा वेंगा यांनी २०२५ बाबत काय भविष्यवाणी!
उद्यापासून नव्या वर्षाला सुरुवात होणार आहे. नवीन वर्ष सर्वांसाठी चांगलं जावं यासाठी प्रत्येकाजण त्यांच्या परीने प्रयत्न करणार आहे. मात्र २०२५ वर्षाबाबत काही भीतीदायक भविष्यवाण्या करण्यात आल्या आहेत. (Baba Venga)बाबा वेंगा आणि नॉस्ट्राडेमस त्यांच्या अचूक भविष्यवाणीसाठी ओळखले जातात. त्यांनी माणसांशी एलियन संपर्क, व्लादिमीर पुतिन यांच्यावर हत्येचा प्रयत्न, दहशतवादी हल्ले यांच्यासह अनेक भविष्यवाणी केल्या आहे.
सर्वात धक्कादायक बाब म्हणजे या दोन्ही व्यक्तींनी 2025 साली युरोपमध्ये विनाशकारी संघर्षाचा अंदाज वर्तवला होता. त्यानंतर मोठा वाद झाल्याचंही पाहायला मिळालं. आता २०२५ येणार असल्याने पुन्हा एकदा अंदाज बांधण्याचे प्रयत्न होत आहेत. मात्र हे वर्ष ब्रिटनसाठी अशुभ असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आलाय.
बाबा वेंगा (Baba Venga)अंध होते. ते बल्गेरियाचे रहिवासी असून 1996 मध्ये त्यांचं निधन झाले. 9/11 हल्ला, राजकुमारी डायनाचा मृत्यू, चेरनोबिल आपत्ती आणि ब्रेक्झिट यांसारख्या महत्त्वाच्या जागतिक घटनांचं भाकीत बाबा वेंगा यांनी केलं होतं. त्याचप्रमाणे फ्रेंचचे नॉस्ट्राडेमस यांनीही अनेक अचूक भाकितं केली आहेत.
बाबा वेंगाच्या म्हणण्यानुसार, एक विनाशकारी युद्ध युरोपला उद्ध्वस्त करणार आहे. या युद्धामुळे खंड नष्ट होणार आहे. रशिया केवळ टिकणार नाही तर जगावर वर्चस्व गाजवेल. युक्रेनविरुद्ध सुरू असलेल्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर हा अंदाज अधिकच खरा ठरणार की काय असा प्रश्न आता निर्माण होतोय. याशिवाय त्यांनी अनेक नैसर्गिक आपत्तींचे भाकीत केलं. यामध्ये अमेरिकेच्या पश्चिम किनाऱ्यावरील भूकंप आणि ज्वालामुखीचा उद्रेक यांचा समावेश आहे.
नॉस्ट्राडेमसने आपल्या भविष्यवाण्यांमध्ये युरोपात विनाशकारी युद्धाचा इशाराही दिलाय. ज्यामुळे त्याचे शत्रू देशातच नव्हे तर आंतरराष्ट्रीय स्तरावरही निर्माण होणार आहेत. 2025 साठी नॉस्ट्रॅडॅमसचे अंदाज विशेषतः भयानक आहेत. विनाशकारी युद्ध, प्लेग नंतर ब्रिटन उद्ध्वस्त होईल असा अंदाज त्यांनी व्यक्त केलाय. त्यांनी भूतकाळातील मोठ्या साथीच्या रोगांबद्दल इशारा दिला आहे.
हेही वाचा :
‘भारतातही तो दिवस दूर नाही’, 2025 च्या पहिल्याच दिवशी ठाकरेंच्या सेनेचं भाकित!
नववर्षात सोन्याला मिळाली तेजी की भावात झाली घसरण? जाणून घ्या काय आहेत आजचे दर
एसटी महामंडळातील मोठा गैरव्यवहार उघड; 2 हजार कोटींचा घोटाळा!