अरेच्चा! श्वानाचा भन्नाट बेली डान्स; VIDEO पाहून नेटकऱ्यांचे हसू थांबेनाच!

सोशल मीडियावर सतत काही ना काही व्हायरल होत असतात. कधी स्टंट, जुगाड, तर लोकांच्या भांडणांचे देखील व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळतात. याशिवाय प्राण्यासंंबंधित अनेक व्हिडिओ देखील पाहायला मिळतात, विशेष करुन मांजर आणि श्वानाचे अनेक व्हिडिओ पाहायला मिळतात. सध्या असाच एक श्वानाचा व्हिडिओ (social media)सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ अनेक नेटकऱ्यांच्या पसंतीस पडत आहे.

हा व्हिडिओ सध्या (social media)सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात चर्चेचा विषय बनला असून यामध्ये दोन श्वान बेली डान्स करताना दिसत आहेत. लोकांनी या व्हिडिओ खूप कौतुक केले आहे. श्वान हा अनेकांचा आवडता प्राणी असल्याने, त्यांच्याशी भावनिक नाते असते. घरातील सदस्यांप्रमाणे त्यांची काळजी घेतली जाते. त्यांना आवडीचा खाऊ, खेळण्यासाठी वेळ आणि फिरायला नेले जाते. अगदी स्वताच्या मुलाप्रमाणे लोक त्याची काळजी घेतात.
श्वानाला कपडे घालणे, त्याला छान तयार करणे असे सगळे लाड केले जातात. व्हायरल व्हिडिओत देखील दोन्ही श्वानाला बेली डान्सचा स्कार्फ बांधण्यात आला आहे. आणि त्याने डान्स सादर केला आहे. विशेष म्हणजे, त्याचा डान्स पाहून बाजूला उभा असलेला दुसरा श्वानदेखील डान्समध्ये सहभागी झाला आहे.
हा व्हिडिओ प्रचंड वेगाने व्हायरल होत असून या व्हिडिओला लाखे व्ह्यूज मिळाले आहेत. यापूर्वीदेखील असे अनेक व्हिडीओ व्हायरल झाले होते. एका व्हिडीओत श्वान मालकाच्या वरातीमध्ये नाचताना दिसला होता, तर दुसऱ्या व्हिडीओत गल्लीतल्या मुलांबरोबर नाचत होता.
व्हायरल होत असलेला व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म @fuckjerry या अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडिओ प्रचंड चर्चेत आहे. या व्हिडीओला सात मिलियनहून अधिक व्ह्युज आणि दोन लाखांहून अधिक लाइक्स मिळाल्या आहेत. व्हिडीओ पाहून अनेकांनी कौतुकाच्या कमेंट्स केल्या आहेत. एका युजरने म्हटले आहे की, “खूपच सुंदर” असे म्हटले आहे.
काहींनी हा डान्स श्वानाच्या मालकिणीने शिकवला असावा असेही म्हटले आहे. सध्या व्हायरल होत असलेल्या या दोन श्वानांच्या बेली डान्सने नेटकऱ्यांना मंत्रमुग्ध केले आहे. त्यांच्या गमतीशीर हालचाली पाहून प्रत्येकालाच हसू अनावर होत आहे. प्राण्यांचे असे खास व्हिडीओ समाजमाध्यमांवरील सकारात्मकता आणि आनंदाचा स्रोत बनत आहेत.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत योग्य नाही वा आमचा कोणताही दावा नाही.
हेही वाचा :
धक्कादायक! महाविद्यालयीन तरुणीवर वेगवेगळ्या ठिकाणी दोनदा बलात्कार
टीम इंडियाला धक्का ! सिडनी टेस्टमधून बाहेर झाला ‘हा’ स्टार खेळाडू
WhatsApp, Telegram आणि Instagram युजर्सवर स्कॅमर्सची नजर, सरकारने दिला अलर्ट!