राज्यातील ‘या’ जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी!

राज्यातील हवामानात मोठ्या प्रमाणात बदल होताना दिसत आहे. अशातच सध्या मान्सूनचा(rain) परतीचा प्रवास देखील सुरू आहे. त्यामुळे राज्यात पावसाचं वेगळं रुप पाहायला मिळत आहे. अशातच आता हवामान विभागाने एक महत्वाची बातमी दिली आहे. येत्या 24 तासांमध्ये राज्यातील पुणे, सातारा आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात पावसाचा परिणाम होणार आहे.

राज्यात पावसाचा(rain) जोर कमी झाला असल्यामुळे विजांच्या कडकडाटासह ढगांचा गडगडाट पाहायला मिळत आहे. अशातच आता भारतीय हवामानशास्त्र विभागाने दिलेल्या माहितीनुसार येत्या काही दिवसांसाठी राज्यातील अनेक भागांना यलो अलर्ट जारी केला आहे. कारण परतीच्या पावसाच्या धर्तीवर हवामान विभागाने हा इशारा दिला आहे.

राज्यात सातारा, कोल्हापूर, सिंधुदुर्ग आणि सांगली या भागात ढगांच्या गडगडाटासह हलक्या स्वरूपात पाऊस हजेरी लावणार असल्याचं हवामान विभागाकडून स्पष्ट करण्यात आलं आहे. तसेच या दरम्यान या जिल्ह्यांमध्ये ताशी 30 ते 40 किमी वेगानं वारे देखील वाहणार असल्याचा इशारा हवामान खात्याकडून देण्यात आला आहे.

सध्या ऑक्टोबर महिना सुरु असल्यामुळे ऑक्टोबर हिटचा तडाखा देखील जास्त प्रमाणात वाढला आहे. राज्यातील विदर्भापासून ते मुंबईपर्यंत उष्णतेचा दाह दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. अशातच मागील काही दिवसांपासून विदर्भात तापमान 35 अंशांच्या वर गेलेलं पाहायला मिळत आहे.

याशिवाय नैऋत्य मान्सून वाऱ्यांनी देखील महाराष्ट्रातून काढता पाय घेतला आहे. त्यामुळे आता नंदुरबारपर्यंत मान्सूननं माघारच घेतली आहे. मात्र असे असताना देखील अद्यापही काही भागांवर कमी दाबाच्या क्षेत्राचे परिणाम मोठ्या प्रमाणात दिसत असून त्या भागात पावसाच्या सरींची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

हेही वाचा :

मुलाबरोबर गरबा खेळताना मृत्यू; धक्कादायक घटनाक्रम कॅमेऱ्यात कैद; Video

शूटिंगदरम्यान इमरान हाश्मी जखमी, 45 वर्षीय अभिनेत्याच्या मानेला झाली गंभीर दुखापत!

काँग्रेसमध्ये प्रवेश करत थेट निवडणुकीत उतरली; विनेश फोगाट आघाडीवर की पिछाडीवर?