‘या लोकांसोबत तुला झोपायला लागेल’, सई ताम्हणकरच्या खुलाशाने खळबळ!

मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री सई ताम्हणकरने (excitement)आपल्या दमदार अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात मोठं स्थान निर्माण केलं आहे. हिंदी सिनेसृष्टीतही तिने आपल्या अभिनयाने अनेकांची मनं जिंकली आहेत. सोशल मीडियावर सईची जबरदस्त फॅन फॉलोइंग आहे.

आपल्या चाहत्यांसाठी सई कायम नवनवीन फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असते. सईच्या वैयक्तिक(excitement) आयुष्याबदल जाणून घ्यायला तिच्या चाहत्यांना कायम आवडतं. दरम्यान एका मुलाखतीमध्ये बोलत असताना सईने मोठा खुालासा केला आहे, ज्याची सगळीकडे एकच चर्चा रंगली.

आपल्या उत्तम अभिनयाने आणि हाॅट अदांनी सई कायम चर्चेत असते. अनेक मुलाखतीमध्ये सई नवनवीन खुलाशे करत असते. दरम्यान, सईने एक असा खुालासा केला आहे ज्यामुळे संपूर्ण सिनेसृष्टी हादरली. सई म्हणाली की, मला एकदा एक काॅल आला होता. त्यावेळी मला सांगितलं की, तुम्हाला अशी अशी भूमीका करावी लागेल.

मी म्हटलं ठीक आहे. नंतर तो म्हणाला की, त्याधी तुला या लोकांबरोबर झोपावं लागेल. मी त्याला म्हटलं की हा मेसेज तू तुझ्या आईला फॉरवर्ड कर. तुझ्या बाबालाही पाठव. मला पुन्हा कधीच फोन किंवा मेसेज करू नकोस. 15-20 वर्षांत पहिल्यांदा आणि एकदाच असं घडलं होतं.

“त्यावेळी कोण बसून काय मेसेज करतोय याची पडताळणी करणंही खूप कठीण होतं. अजूनही आपल्याला माहित नसतं की मेसेज करतेय ती व्यक्ती कोण आहे,” असं सई ताम्हणकर म्हणाली.

सई ही कधी तिच्या लुक्समुळे तर कधी तिच्या चित्रपटांमुळे कायमच प्रेक्षकांच्या पसंतीस पडत आलीये. सईने तिच्या प्रवासाविषयी बोलताना म्हटलं की, अभिनयात यायचं हे कधीच ठरवलं नव्हतं. मला चांगली माणसं भेटत गेली, चांगल्या संधी मिळत गेल्या. मी सांगलीवरुन थेट मुंबईत आले. पहिल्यांदा मी जेव्हा मुंबईत आले तेव्हा या गोजिरवाण्या घरात मालिकेसाठी आले आणि तिथून बाकीचा प्रवास सुरु झाला.

हेही वाचा :

‘होय, मलाही अटक करण्याचा प्रयत्न झाला’; CM शिंदेंचा खुलासा

दोन प्रवाशांनी एकमेकांना लाथा-बुक्क्यांनी कुटलं पाहा VIDEO

…तर खात्यातील 1500 रुपये काढून घेऊ; लाडकी बहीण योजनेबद्दल राणांचं धक्कादायक वक्तव्य