कॉल गर्लमुळे तरुणाची आत्महत्या, गुगलवरील कॉल गर्लचा मोबाईल नंबर बेतू शकतो जीवावर.
गुगलवर (google)अनेक गोष्टी सर्च केल्या की मिळतात. पण, त्या खऱ्याच असतील असं नाही. यातून अनेकांची फसवणूक ही होते. अशाच पद्धतीने कॉल गर्लचे खोटे मोबाईल नंबर गुगलवर अपलोड करून तरुणांना फसवणाऱ्या गुन्हेगारी टोळीला पिंपरी- चिंचवडच्या खंडणी विरोधी पथक आणि दिघी पोलिसांनी कोलकत्ता येथून अटक केली आहे. गुगलवर कॉल गर्लचे खोटे मोबाईल नंबर अपलोड करून तरुणांना प्रेमाच्या जाळ्यात ओढायचं. मग त्यांचे फोटो सोशल मीडियातून मिळवायचे आणि ते अश्लील पद्धतीने मॉर्फ करून खंडणी मागायची अशी मोडस या टोळीची होती.
या टोळीने एका तरुणाला आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दिघी पोलीस ठाण्यात दाखल आहे. अश्लील पद्धतीने फोटो मॉर्फ करून सोशल मीडियावर पोस्ट करण्याची धमकी तरुणाला दिली होती. या त्रासाला कंटाळून मे महिन्यात तरुणाने आत्महत्या केली होती. तरुणाने १२ हजार रुपये ऑनलाइन पाठवले. तरीही आरोपी तरुणाला त्रास देत होते. ५१ लाखांची मागणी तरुणाकडे केली होती. याच त्रासाला कंटाळून अखेर तरुणाने आत्महत्या केली होती. याच प्रकरणाचा तपास करत असताना सहा जणांच्या टोळीला कोलकत्ता येथून अटक केली आहे. नवीनकुमार महेश राम, सागर महेंद्र राम, सूरजकुमार जगदीश सिंग, मुरली हिरालाल केवट, अमरकुमार राजेन्द्र राम, धिरनकुमार राजकुमार पांडे अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कोलकत्ता येथील फ्लॅटमधून कॉल गर्लचं कॉल सेंटर चालवून देशातील अनेक शहरातील तरुणांना प्रेमाच्या जाळ्यात ओढणाऱ्या टोळीला अखेर अटक करण्यात आली आहे. कोलकत्ता येथील डायमंड प्लाझा परिसरातून सहा जणांना अटक करण्यात आली. आरोपी हे गुगलवर कॉल गर्लचे खोटे मोबाईल नंबर अपलोड करत. कॉल गर्लच्या नावाखाली आरोपी व्हाईस चेंजरद्वारे तरुणींच्या आवाजात बोलत होते अशी माहिती पोलिसांनी दिली. तरुणांना मैत्रीच्या जाळ्यात ओढून प्रेमात पाडत. काही वेळा बोलणं झाल्यानंतर सोशल मीडियाच्या अकाउंटवरून फोटो मिळवून आरोपी हे फोटो अश्लील पद्धतीने मॉर्फ करुन तरुणांना पाठवून खंडणी मागत. समोरील तरुण बदनामीच्या भीतीने ऑनलाइन पैसे ट्रान्सफर करत. अखेर या टोळीला अटक करण्यात आली आहे. आरोपींकडून १५ मोबाईल, ७ व्हाईस चेंजर, ४० सिमकार्ड, १४ डेबिट कार्ड, ८ आधार कार्ड, असा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. ही कारवाई खंडणी विरोधी पथकाने केली आहे.
हेही वाचा :
पत्नी सोडून गेल्याने पती निराश, दारूच्या नशेत पतीनं असं काही केलं की?
शिंदेंना किती ठिकाणी धक्का बसणार? विधानसभेत भाजपला 45 जागांवर फटका?
आषाढी वारी’साठी यंदा ST थेट तुमच्या गावात, 5000 जादा बसेस सोडणार.