घटस्फोटाच्या एक महिन्यातच युझवेंद्र चहल आणि आरजे महवेशचं नातं झालं कन्फर्म?

भारतीय क्रिकेट टीमचा स्टार फिरकीपटू युझवेंद्र चहल आणि आरजे महवाश हे गेल्या काही दिवसांपासून त्यांच्या कथित लिंक-अपच्या अफवांमुळे सोशल मीडियावर सतत चर्चेत आहेत. मात्र दोघांनीही या नात्यावर मौन पाळले असले तरी, इंटरनेट युजर्सला अनेकदा ते डेटिंग(relationship) करत असल्याचा विश्वास वाटतो याचे कारण व्हायरल होणारे फोटो आणि व्हिडीओ.

नुकत्याच एका व्हिडीओने या चर्चेत आणखीनच भर पडली आहे. यामध्ये पुन्हा एकदा दोघेही एकत्र दिसले आणि काही वेळातच हा व्हिडीओ इंटरनेटवर व्हायरल झाला आहे. युझवेंद्र चहलचा अलीकडेच घटस्फोट झाला असून या त्याला लगेच नवीन प्रेम(relationship) मिळाले अशी चर्चा आहे.
रविवारी, 6 एप्रिलला युजवेंद्र चहल आणि त्याची कथित गर्लफ्रेंड आरजे महवेश पुन्हा एकदा एकत्र दिसले. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या एका व्हिडीओमध्ये दोघेही पंजाब किंग्जच्या खेळाडूंसोबत हॉटेलच्या लॉबीमध्ये थांबलेले दिसले. लांबून रेकॉर्ड करण्यात आलेल्या या व्हिडीओमध्ये दोघेही त्यांच्या टीममधील दुसऱ्या सदस्याशी बोलताना दिसत आहेत. या दोघांशिवाय संघाचे मुख्य प्रशिक्षक रिकी पाँटिंगही दिसत आहेत.
नोट करण्यासारखी गोष्ट म्हणजे, व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये युजवेंद्र गुलाबी रंगाचा टी-शर्ट आणि डेनिम पँट घातलेला दिसत होता. तो खांद्यावर बॅग आणि बॅग घेऊन आला होता. दरम्यान, महवशने राखाडी रंगाचा ट्रॅकसूट पूर्णपणे स्वतःला लपवले होते. एवढंच नाही तर तिने तिच्या डोक्यावर लाल टोपी घातली होती. त्याने आपला चेहराही मास्कने झाकला होता. लोकांनी या दोघांचा हा व्हिडीओ लगेच व्हायरल केला.
दुसरीकडे, त्याच्या डेटिंगच्या अफवांच्या दरम्यान, आरजे महवेशने दावा केला की ती सध्या सिंगल आहे आणि तिने आजच्या जगात लग्नाच्या कल्पनेवर शंका व्यक्त केली. आयुष्याच्या या टप्प्यावर ही कल्पना तिला अपरिचित वाटत असल्याने तिने लग्नाचा विचार तूर्तास थांबवला असल्याचे आरजे महवेशने पुढे नमूद केले. चहलने आधी कंटेंट क्रिएटर धनश्री वर्माशी 2020 साली लग्न केले होते. पण, 20 मार्च 2025 रोजी त्यांचा अधिकृतपणे घटस्फोट झाला.
हेही वाचा :
आनंदाची बातमी! आठवड्याच्या सुरुवातीलाच घसरल्या सोन्याच्या किमती
महिलांनो हार्ट अटॅकची ही लक्षणे दुर्लक्षित करू नका डॉक्टरांचा गंभीर इशारा
प्रवास आणखी महागणार! CNG च्या किंमती वाढल्या;