आयपीएल २०२५ नंतर युजवेंद्र चहल या संघाकडून खेळताना दिसणार, अचानक घेतला मोठा निर्णय

भारताचा स्टार फिरकी गोलंदाज युझवेंद्र चहलला चॅम्पियन ट्रॉफीमध्ये स्थान मिळाले नाही, पण सध्या तो त्याच्या वैयक्तिक जीवनामुळे सातत्याने चर्चेत राहिला आहे. इंडियन प्रीमियर लीग २०२५ च्या नव्या सिझनला आठ दिवसात सुरुवात होणार आहे. या स्पर्धेमध्ये १० संघ(team) सहभागी होणार आहेत.

यंदा भारताचा स्टार फिरकीपटू युजवेंद्र आयपीएल २०२५ मध्ये पंजाब किंग्जकडून खेळताना दिसणार आहे. यंदा चहलला पंजाब किंग्सने मेगा ऑस्कशमध्ये १८ कोटींना विकत घेतले आहे. जेव्हा त्याला भारतीय संघासाठी(team) खेळण्याची संधी मिळाली आहे तेव्हा त्याने त्याच्या फिरकीची जादू दाखवली आहे.

दोन महिन्यांच्या या स्पर्धेच्या समाप्तीनंतर, चहल २०२५ काउंटी चॅम्पियनशिप हंगामासाठी नॉर्थम्प्टनशायरला परतेल. चहलने गेल्या वर्षी काउंटी चॅम्पियनशिपमध्येही भाग घेतला होता, जिथे त्याने आपल्या फिरकीने अनेक फलंदाजांना नाचवायला लावले. चहल आता या हंगामातही आपली जादू दाखवण्यास सज्ज आहे.

चहल केवळ काउंटी चॅम्पियनशिपमध्येच भाग घेणार नाही तर त्यानंतर इंग्लंडची स्थानिक एकदिवसीय स्पर्धा असलेल्या वन-डे कपमध्येही सहभागी होईल. चहलचा पहिला सामना २२ जून रोजी मिडलसेक्स विरुद्ध होण्याची शक्यता आहे. गेल्या वर्षी, चहलने इंग्लंडमध्ये पदार्पण केले, जिथे त्याने केंटविरुद्धच्या पहिल्याच सामन्यात पाच विकेट्स घेतल्या.

गेल्या वेळी, चहल फक्त ४ प्रथम श्रेणी सामने खेळू शकला होता, परंतु २१ च्या प्रभावी सरासरीने तो १९ विकेट्स घेण्यात यशस्वी झाला. त्याच्या नेतृत्वाखाली, नॉर्थम्प्टनशायरने डर्बीशायर आणि लीसेस्टरशायर विरुद्ध सलग सामने जिंकले. मागील सामन्यांमध्ये त्याने १५ सामने खेळले होते यामध्ये त्याने १८ विकेट घेण्यात यशस्वी झाला होता. २०२४ मध्ये त्याने आयपीएलमध्ये १४ सामन्यात २१ विकेट्स नावावर केले होते.

दुसऱ्यांदा काउंटी खेळण्याबद्दल चहल म्हणाला, ‘गेल्या हंगामात मी येथे खूप आनंद घेतला, म्हणून परत आल्याने मला खूप आनंद होत आहे. त्या ड्रेसिंग रूममध्ये काही उत्तम लोक आहेत आणि मी पुन्हा त्याचा भाग होण्यासाठी उत्सुक आहे. हंगामाच्या शेवटी आम्ही काही उत्तम क्रिकेट खेळलो. त्यामुळे आशा आहे की आपण ते पुन्हा करू शकू आणि काही विजय मिळवू शकू.”

हेही वाचा :

प्रियकराने पतीसमोरच S*x चा केला हट्ट

लाडक्या बहि‍णींची निराशा, आता २१०० रुपये कधी येणार?

भाजप पदाधिकाऱ्याकडून अल्पवयीन मुलीचा विनयभंग पिस्तुलाचा धाक दाखवत केला अत्याचार