झटपट आमरस बनवण्याची सोपी रेसिपी

उन्हाळ्यात आंबा खाण्याचा मोह कोणालाच आवरत नाही. सगळ्यांना आंबा खाल्याला आवडतो. गुढीपाडवा सणांच्यानंतर बाजारात मोठ्या प्रमाणावर आंबे येतात. लहान मोठ्यांपासून सगळ्यांचं आंबे आवडतात. आंबाप्रेमी उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये बाजारात कधी आंबा येतोय याची वाट पाहत असतात. काही जण आंबा सोलून खातात तर काही जण आंबा कापून खातात. मात्र अनेकांना आंब्यापासून बनवलेला आमरस देखील खायला आवडतो. पण आमरस बनवायचा म्हंटल खूप भांडी पडतात यामुळे अनेकदा आमरस बनवण्यासाठी कंटाळा केला जातो. पण आम्ही तुम्हाला आमरस बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. चला तर पाहुयात कसा बनवतात आंब्यापासून आमरस..

साहित्य:-
आंबा ,साखर,दूध, बर्फाचे तुकडे, वेलची पावडर, केशर

कृती:-

सर्वप्रथम आमरस बनवण्यासाठी २ पिकलेले आंबे थोडावेळ पाण्यात टाकून ठेवावे. त्यानंतर हे आंबे साल काढून कापून घ्या. आंब्याच्या बारीक बारीक फोडी करून घ्या. बारीक फोडी करून झाल्यानंतर मिक्सरच्या भांड्यात आंब्याच्या बारीक फोडी, चवीनुसार साखर, दूध आणि २ ते ३ बर्फाचे तुकडे टाकून मिक्सरला वाटून घ्या. आमरस तयार झाल्यानंतर एका बाऊलमध्ये काढून घ्या. त्यावर सजावटीसाठी केशरच्या दोन तीन काड्या टाकून सजवा.