नोकरीच्या शोधात आहात? एक मोठी संधी चालून आलीये.
नोकरीच्या शोधात आहात? मग आता यापुढे नो टेन्शन. विशेष म्हणजे थेट सरकारी नोकरी करण्याची मोठी संधी तुमच्याकडे आहे. इच्छुकांनी अजिबातच वेळ वाया न घालता या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करावीत. खरोखरच ही एकप्रकारची मोठी संधी नक्कीच म्हणावी लागेल. या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्यासाठी आता अवघे दोनच दिवल शिल्लक आहेत. विशेष म्हणजे निवड झालेल्या उमेदवारांना तगडा पगार देखील मिळणार आहे. ही भरती प्रक्रिया अलाहाबाद उच्च न्यायालयाकडून राबवली जात आहे. चला तर मग जाणून घ्या या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची सोपी प्रक्रिया.
अलाहाबाद उच्च न्यायालयाकडून राबवली जाणारी ही भरती प्रक्रिया तब्बल 83 पदांसाठी राबवली जात आहे. 15 मार्च 2024 पासून या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू झालीये. या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 30 एप्रिल 2024 आहे. इच्छुकांना त्यापूर्वीच या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करावी लागणार आहेत. उशीरा आलेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.
या भरती प्रक्रियेसाठी वयाची अट ही लागू करण्यात आलीये. 35 ते 45 वयोगटातील उमेदवार हे या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करू शकतात. या भरती प्रक्रियेतून निवड झालेल्या उमेदवाराला 1,44,840 ते 1,94,660 रूपये पगार मिळेल. या भरती प्रक्रियेसाठी आपल्याला फक्त आणि फक्त ऑनलाईन पद्धतीने अर्ज ही करावी लागणार आहेत.
या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्यासाठी आपल्याला allahabadhighcourt.in या साईटला भेट द्यावी लागेल. तिथेच आपल्याला भरती प्रक्रियेबद्दलची सविस्तर माहिती मिळेल. या भरती प्रक्रियेसाठी वयाची आणि शिक्षणाची अट ही लागू करण्यात आलीये. इच्छुकांनी फटाफट या भरती प्रक्रियेसाठी अर्ज ही करावीत. थेट अलाहाबाद उच्च न्यायालयात नोकरी करण्याची संधी तुमच्याकडे आहे.
तसेच बीएसएफमध्येही नोकरी करण्याची संधी तुमच्याकडे आहे. सहाय्यक कमांडंटसाठी भरती प्रक्रिया राबवली जात आहे. विशेष बाब म्हणजे 14 मे 2024 पर्यंत तुम्ही भरती प्रक्रियेसाठी अर्ज करू शकतात.186 पदांसाठी भरती सुरूवात आहे. ही खरोखरच एकप्रकारची बंपर भरती आहे. upsconline.nic.in या साईटला जाऊन तुम्ही भरती प्रक्रियेसाठी अर्ज ही करू शकतात.