पंकजा मुंडेंनी बोलून दाखवली मनातील इच्छा

लोकसभा निवडणुकीत उमेदवार देताना भाजपने अनेक बदल केलेत. बीडमध्येही प्रीतम मुंडेंना डच्चू देत पंकजा मुंडेंना उमेदवारी देण्यात आली. राज्यातील राजकारणात डावलल्या जाणाऱ्या पंकजा मुंडेंना लोकसभेची उमेदवारी देत भाजपने त्यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न केला, परंतु त्या दिल्लीपेक्षा राज्यातील राजकारणात राहण्यास अधिक इच्छुक असल्याचं दिसत आहेत. आपल्याच एका प्रचारसभेत बोलतांना पंकजा मुंडे यांनी आपल्यातील मनातील इच्छा बोलून दाखवलीय.

खरं तर मी इथेच पाहिजे तुमची काळजी घेण्यासाठी. मात्र मी तिथं गेले तरी मी तुमची काळजी घेईल. मोबाईल टॉवर देखील लांबून रेंज देते, असं प्रतिपादन पंकजा मुंडे यांनी केलंय. त्यांच्या विधानामुळे त्या दिल्लीपेक्षा राज्यातील राजकारणात राहण्यात त्या अधिक इच्छुक असल्याचं जाणवलं. तर केंद्रात प्रीतम मुंडे गेल्या पाहिजे होत्या, अशी इच्छा पंकजा मुंडे यांनी चिंचाळा येथे बोलून दाखवली. खासदार प्रीतम ताईंचे देखील चांगलं चाललं होतं. प्रीतम ताईंची हट्रिक व्हावी, अशी माझी इच्छा होती असं पंकजा मुंडे म्हणाल्या.