भाजपचे उमेदवार उज्ज्वल निकम यांना उद्धव ठाकरे मतदान करणार? कारण…

राज्यातील, देशातील नव्हे तर आंतरराष्ट्रीय पातळीवर खटले गाजवणारे(candidate search) प्रसिद्ध विधिज्ञ उज्ज्वल निकम राजकारणात उतरले आहेत. त्यांनी आपल्या राजकारणाची सुरुवात जन्मभूमी असलेल्या जळगाव ऐवजी कर्मभूमी मुंबई निवडली आहे. मुंबईतील उत्तर मध्य लोकसभा जागेवरुन भारतीय जनता पक्षातून ते लोकसभेची निवडणूक लढत आहेत.

उत्तम मध्य मुंबई लोकसभा मतदार संघात सहा विधानसभा(candidate search) मतदार संघ आहे. त्यात विले पार्ले,चांदिवली, कुर्ला, वांद्रे पूर्व, वांद्रे पश्चिम, कलिना यांचा समावेश आहे. हायप्रोफाईल लोकांच्या या मतदार संघात उज्ज्वल निकम उमेदवार आहेत. शिवसेना ठाकरे गटाचे नेते उद्धव ठाकरे या मतदार संघात मतदार आहेत. ते भाजपचे असलेल्या उज्ज्वल निकम यांनी मतदान करतील, असा विश्वास उज्ज्वल निकम यांचा मुलगा अनिकेत निकम यांनी व्यक्त केला.

माझ्या आयुष्याला कलाटणी देणारा हा प्रसंग आहे. मी बाप्पाच्या आशीर्वादाने आज उमेदवारी अर्ज भरण्यास जात आहे. राजकारणात येईल, असे मला कधीही वाटले नव्हते. मोदीजी यांच्या विकासाच्या मुद्द्यावर या निवडणुकीला सामोरे जात आहे. लोकांचं मोदी सरकारवर प्रेम दिसत आहे. यामुळे मला विजयाचा विश्वास आहे, असे उज्ज्वल निकम यांनी म्हटले.

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या स्वप्नातील भारत आणि विकास कामे पाहून राजकारणात येण्याचा निर्णय साहेबांनी घेतला आहे. याआधी त्यांनी वकील म्हणून उत्तम काम केलेले आहे. आता ते राजकारणाच्या नवीन भूमिकेतही नक्की यश मिळवतील. शिवसेना ठाकरे गटाचे नेते उद्धव ठाकरे आमचे मतदार आहेत. त्यांनीही ही मोदीजींनी केलेल्या विकासाच्या मुद्यावर निकम साहेबांना मतदान करावे, असे मी आवाहन करत असल्याचे अनिकेत निकम यांनी म्हटले.

उज्ज्वल निकम यांच्या पत्नी ज्योती निकम यांनी सांगितले की, साहेबांनी वकील म्हणून आजवर मोठी कामे केली आहेत. लोकांच्या गरजा लक्षात घेऊन ती कामे केलेली आहेत. आम्ही आनंदी आहोत की हा क्षण आमच्या कुटुंबासाठी आला. ते राजकारणही अव्वल ठरतील, असा मला विश्वास असल्याचे त्यांनी सांगितले.

हेही वाचा :

जान्हवी कपूरच्या होणाऱ्या दिराला डेट करतेय सारा अली खान?

अदानी ग्रुपच्या ६ कंपन्यांना सेबीकडून कारणे दाखवा नोटीस

काय सांगता! रडणे देखील आरोग्यासाठी फायदेशीर आहे