पोलिसांनी गोमांसासह साडेआठ लाखाचा मुद्देमाल व दोन तस्करांना पकडले

कोपरगाव शहर पोलिसांनी 27 एप्रिल 2024 रोजी रात्री समृद्धी टोल नाका येथे बेकायदा गोमांसाची वाहतूक करणारा टेम्पो जप्त केला. या प्रकरणी दोन आरोपींना ताब्यात घेतले असून एकून 8 लाख 70 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

समृद्धी महामार्गावरून गोमांसाची वाहतूक केली जात असल्याची माहिती कोपरगाव शहार पोलिसांना मिळाली होती. पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार शनिवार (27 एप्रिल 2024) रोजी रात्री 12 च्या सुमारास महामार्गावर नाकाबंदी केली. वाहणांची तपासणी केली असता पोलिसांना गोमांसाची वाहतूक करणारा टेम्पो हाती लागला. टेम्पोची तपासणी केली असता त्यामध्ये 1700 किलो गोमांस आढळून आले. त्यामुळे संशयीत चालक व अन्य एक अशा दोघांना ताब्यात घेत पोलिसांनी गोमांस व टेम्पो असा सुमारे 8 लाख 70 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी पोलीस हेड कॉन्स्टेंबल दिंगबर शेलार यांच्या फिर्यादीवरून तक्रार दाखल केली आहे. आरोपी मोहम्मद कैफ शरीफ कुरेशी (20) व रिजवान मलंग कुरेशी (36) दोघही कुर्ला (मुंबई) येथील रहिवासी आहेत. पोलिसांनी प्राणी संरक्षण व गोवंश हत्या बंदी कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास पोलीस निरीक्षक प्रदीप देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेड कॉन्स्टेबल किशोर जाधव करत आहेत.