तिकीटावरुन वाद.. धावत्या बसमध्ये प्रवाशाचा कंडक्टरवर चाकू हल्ला

नागपूरवरून छत्रपती संभाजीनगरला जाणाऱ्या बसमध्ये(tiket bas) वाचकावर एका प्रवाशाने चाकू हल्ला करत मारहाण केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. तिकीटावरुन वाद झाल्याने प्रवाशाने बस कंडक्टरला मारहाण केली. या मारहाणीत बस कंडक्टर जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

याबाबत समोर आलेल्या माहितीनुसार, नागपूरवरून छत्रपती संभाजीनगरला जाणाऱ्या बसमध्ये(tiket bas) एका प्रवाशाने कंडक्टरला मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडली. फिरोज शेख असे हल्ला केलेल्या प्रवाशाचे नाव असून योगेश काळे असे जखमी बस वाहकाचे नाव आहे. तिकीटावरुन झालेल्या वादातून ही घटना घडली.

बस नागपूरवरुन निघाल्यानंतर कोंढाळी दरम्यान फिरोज आणि वाहक योगेश काळे यांच्यात तिकीटावरुन वाद झाला. योगेश काळे याने तिकीट दाखव असे म्हटले मात्र फिरोज तिकीट दाखवत नसल्यानं गोंधळ वाद झाला. याच वादाचे रुपांतर कडाक्याच्या भांडणात झालं आणि फिरोजने चाकू काढून योगेश काळे याला गंभीर जखमी केले.

दरम्यान, या घटनेनंतर बसमधील प्रवाशांनी हल्लेखोराला पकडले. तसेच बस चालक संतोष जाधव यांनी बस पोलीस ठाण्यात घेतली. या हल्ल्यात योगेश काळे हे जखमी झाले असून त्यांच्यावर कोंढाळी आरोग्य केंद्रात उपचार करण्यात आले. याप्रकरणी फिरोज शेखला अटक करण्यात आली असून कोंढाळी पोलिसांनी गुन्हा दाखल करत या घटनेचा तपास सुरू केला.

हेही वाचा :

वर्ल्डकपआधीच भारतासाठी गुड न्यूज; ‘सिक्सर किंग’ युवराज सिंह…

भाजप वापरणार ठाकरे पॅटर्न; शिंदेसेनेला ‘सायलेंट’ करण्याची तयारी

मविआ उमेदवाराकडून अजित पवारांना वाकून नमस्कार; राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण