राजू शेट्टी यांनी कारखानदारांवर जोरदार केली टीका..

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकीय वातावरण चांगलच तापलं आहे. राजकीय नेते ऐकमेकावंर आरोप प्रत्यारोप करत आहे. अशातच हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील राजकीय वातावरण देखील चांगलच गरम झालं आहे. या मतदारसंघातून राजू शेट्टी निवडणूक लढवत आहेत. त्यांनी प्रचाराला सुरुवात केलीय. शिरसीमध्ये आयोजीत केलेल्या प्रचारसभेत बोलताना राजू शेट्टी यांनी कारखानदारांवर जोरदार टीका केली. कारखानदार आपल्या बगलबच्च्यांचा ऊस अगोदर नेतात. पण तुमच्यासारख्या सर्वसामान्य शेतकऱ्यांचा ऊस जाळून न्यायला लावतात, असे राजू शेट्टी म्हणाले. 

साखर कारखानदाराने स्वतःचा ऊस कधी जाळून गाळपास नेलाय का?

माझ्या विरोधात साखर कारखानदार लोकसभेच्या प्रचारात उतरले आहेत. पण बिले द्यायचे नाव काढत नाहीत. शेतकऱ्यांचा ऊस या लोकांनीच वाळवलेला आहे. कारण यांच्याकडे टोळ्या कमी आहेत. तोडणी यंत्रणा कमी आहे. बहुसंख्या टोळ्या पळून गेल्या आहेत. आपल्या बगलबच्च्यांचा ऊस अगोदर नेतात. पण तुमच्यासारख्या सर्वसामान्य शेतकऱ्यांना ऊस जाळून न्यायला लावतात. एखाद्या साखर कारखानदाराने स्वतःचा ऊस जाळून गाळपास गेलेले एक उदाहरण असेल तर मला द्या असेही शेट्टी म्हणाले. सर्वसामान्य व गोरगरीब शेतकऱ्यांची ऊस जाळून कारखान्याला जातो. यामुळं शेतकऱ्याचं नुकसान होते असे राजू शेट्टी म्हणाले. 

शेतकऱ्यांनी संघटीत होऊन लढा दिला पाहिजे

माझ्यावर काही महाभाग टीका करत आहेत की, राजू शेट्टी यांनी आंदोलन केले म्हणून ऊसाच्या तोडण्या उशीरा सुरू झाल्या. फेब्रुवारीनंतर दरवर्षी साखर कारखानदार ऊस जाळूनच नेतात. त्यात सभासद नसला की टनाला 300 रुपये कमी करतात. यामधूनही पण शेतकऱ्यांची लूट करत आहेत. शेतकऱ्यांची अवस्था अतिशय वाईट आहे. शेतकऱ्यांनी संघटीत होऊन लढा दिला पाहिजे. तरच शेतकरी चळवळ टिकणार आहे असं राजू शेट्टी म्हणाले. आपण देशाला अन्नधान्य पुरवतो. मात्र शेतकरी उपाशीची आहे. शेतीमालाला हमीभाव मिळाल्यास शिराळा तालुक्यातील डोंगरी भागातील युवकांना रोजगारासाठी मुंबईला जायची गरज भासणार नाही. यासाठी मला एमएसपीचा कायदा मंजूर करून घेण्यासाठी संसदेत जायचे आहे असे राजू शेट्टी म्हणाले. 

शेतकऱ्यांच्या अवस्थेला राज्यकर्तेच जबाबदार 

शिराळा तालुका हा दुर्गम भाग आहे. ऊसाबरोबरच इतर पिके देखील याठिकाणी घेतली जातात. येथील शेतकऱ्यांची गुंट्याची शेती आहे. शेतीमालाला दर मिळत नाही. शेतकऱ्यांची या अवस्थेला राज्यकर्तेच जबाबदार आहेत. ग्रामीण भागात रोजगार मिळत नाही. मिळतो तो केवळ शेतीमधूनच. त्यासाठी लोकांना पुणे, मुंबईत नोकरीसाठी जावे लागते. शेतीमालाला दर मिळावा म्हणून गेली 30 वर्षे मी संघर्ष करतोय. मी खासदार असताना लोकसभेत दोन अशासकीय विधेयके मांडलेली आहेत. शेतकऱ्यांच्या शेतीमालाला दीडपट हमीभाव, शेतकऱ्यांना कर्जमुक्ती अधिकर 2018 या दोन विधेयकांना अद्यापही मंजुरी मिळालेली नाही. मला संसदेत जाऊन ती विधेयके मंजूर करून घ्यायची आहेत. त्यासाठी मी लागेल ती किंमत मोजायला तयार असल्याचे शेट्टी म्हणाले.