ॲपच्या माध्यमातून माहिती करुन घ्या मतदान केंद्र
- ॲप उघडताच तुम्हाला स्किप हा पर्याय दिसेल. त्यावर तुम्ही क्लिक केल्यावर या ॲपवर तुम्हाला सर्व पर्याय दिसतील. तुमचे जवळचे मतदान केंद्र ओळखण्यासाठी ॲपमध्ये सर्वात वरील भागातील Search Your Name in Electoral Roll वर क्लिक करा.
वोटर हेल्पलाईन ॲप
हा पर्याय निवडल्यावर तुमच्यासमोर अनेक पर्याय उघडतील. त्यात सर्च बाय मोबाईल, सर्च बाय बार/क्यूआर कोड, सर्च बाय डिटेल्स आणि सर्च बाय EPIC No असे पर्याय दिसतील. EPIC नंबर हा तुमचा Voter ID Card क्रमांक असतो.
Polling Station Online Search : ही सरकारी साईट करेल मदत
- जर तुम्ही मोबाईलमध्ये Voter Helpline App डाऊनलोड केले नसेल तरी काही हरकत नाही. तुम्ही ऑनलाईन पद्धतीने पण मतदान केंद्राची माहिती मिळवू शकता. त्यासाठी तुम्हाला https://electoralsearch.eci.gov.in/ या सरकारी संकेतस्थळावर जावे लागेल.
- electoralsearch.eci.gov.in या साईटवर गेल्यावर तुमचे मतदान केंद्र माहिती करुन घेण्यासाठी तुम्हाला Search by EPIC, Search by Details आणि Search by Mobile असे तीन पर्याय मिळतील. सर्च बाय ईपीआयसी या पर्यायात तुम्हाला मतदान कार्ड क्रमांक टाकावा लागेल. तर दुसरा पर्यायात, तुम्हाला विचारलेला तपशील भरावा लागेल. तिसरा पर्याय हा सर्च बाय मोबाईल असा आहे. यामध्ये तुमच्या मतदान कार्डशी संबंधित मोबाईल क्रमांक तुम्हाला येथे टाकावा लागेल.
उद्यापासून भारतीय लोकशाहीचा उत्सव सुरु होत आहे. पहिल्या टप्प्यातील मतदान 19 एप्रिल रोजी होत आहे. Lok Sabha Election 2024 मध्ये मतदानाचा हक्का बजावण्यासाठी तुमच्या घराजवळील मतदान केंद्र कोणते हे तुम्हाला पण सहज माहिती करता येते. जर तुमचे मतदान केंद्र कोणते आहे हे माहिती नसेल, तर घरातून बाहेर पडण्यापूर्वी त्याची माहिती करुन घ्या. तुमचे मतदान केंद्र कोणते आहे, हे माहिती करुन घेण्यासाठी दोन पद्धती आहेत.
Voter Helpline App: ॲपच्या माध्यमातून माहिती करुन घ्या मतदान केंद्र
सर्वसामान्य नागरिकांच्या सुविधेसाठी निवडणूक आयोगाने हे मोबाईल ॲप तयार केले आहे. हे मोबाईल ॲप अँड्राईड आणि आयओएस या दोन्ही युझर्ससाठी उपलब्ध आहे.
सर्वात अगोदर तुम्ही मोबाईलमध्ये वोटर हेल्पलाईन ॲप, गुगल प्ले स्टोअरवरुन डाऊनलोड करुन घ्या. ॲप्पल युझर्स त्यांच्या स्टोअरमधून हे ॲप डाऊनलोड करु शकतील. ॲप उघडल्यावर तुम्ही लॉगिन न होता पण तुमचे मतदान केंद्र हुडकू शकता.
ॲप उघडताच तुम्हाला स्किप हा पर्याय दिसेल. त्यावर तुम्ही क्लिक केल्यावर या ॲपवर तुम्हाला सर्व पर्याय दिसतील. तुमचे जवळचे मतदान केंद्र ओळखण्यासाठी ॲपमध्ये सर्वात वरील भागातील Search Your Name in Electoral Roll वर क्लिक करा.
वोटर हेल्पलाईन ॲप
हा पर्याय निवडल्यावर तुमच्यासमोर अनेक पर्याय उघडतील. त्यात सर्च बाय मोबाईल, सर्च बाय बार/क्यूआर कोड, सर्च बाय डिटेल्स आणि सर्च बाय EPIC No असे पर्याय दिसतील. EPIC नंबर हा तुमचा Voter ID Card क्रमांक असतो.
Polling Station Online Search : ही सरकारी साईट करेल मदत
जर तुम्ही मोबाईलमध्ये Voter Helpline App डाऊनलोड केले नसेल तरी काही हरकत नाही. तुम्ही ऑनलाईन पद्धतीने पण मतदान केंद्राची माहिती मिळवू शकता. त्यासाठी तुम्हाला https://electoralsearch.eci.gov.in/ या सरकारी संकेतस्थळावर जावे लागेल.
electoralsearch.eci.gov.in या साईटवर गेल्यावर तुमचे मतदान केंद्र माहिती करुन घेण्यासाठी तुम्हाला Search by EPIC, Search by Details आणि Search by Mobile असे तीन पर्याय मिळतील. सर्च बाय ईपीआयसी या पर्यायात तुम्हाला मतदान कार्ड क्रमांक टाकावा लागेल. तर दुसरा पर्यायात, तुम्हाला विचारलेला तपशील भरावा लागेल. तिसरा पर्याय हा सर्च बाय मोबाईल असा आहे. यामध्ये तुमच्या मतदान कार्डशी संबंधित मोबाईल क्रमांक तुम्हाला येथे टाकावा लागेल.