56 वर्षांच्या अभिनेत्यासोबत 26 वर्षीय अभिनेत्रीचा रोमान्स
बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार आणि टायगर श्रॉफचे मागचे काही चित्रपट हे बॉक्स ऑफिसवर अपयशी ठरले. (romances)आता सगळ्यांना त्यांच्या ‘बडे मियां छोटे मिया’ या चित्रपटाकडून प्रेक्षकांना आशा आहेत. तर या चित्रपटानं पहिल्या आठवड्यात चांगली कमाई केली पण त्यानंतर त्याची बॉक्स ऑफिसवर परिस्थिती ही खराब होत गेली. या चित्रपटात अक्षय कुमार आणि टायगर श्रॉफशिवाय मानुषी छिल्लर आणि अलाया एफ, सोनाश्री सिन्हा, रोनित रॉय, मनीष चौधरी हे कलाकार देखील दिसले. आता मानुषी छिल्लरनं चित्रपटाच्या अपयशावर वक्तव्य केलं आहे.
मानुषी छिल्लरनं (romances)स्वत: 30 वर्षांनी मोठा असलेल्या अक्षय कुमारच्या ‘सम्राट पृथ्वीराज’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. या चित्रपटातून त्या दोघांच्या जोडीन प्रेक्षकांची मने जिंकली नाहीत. झूमला दिलेल्या मुलाखतीत मानुषीनं या चित्रपटाच्या अपयशा विषयी सांगितलं की माझ्या आयुष्यात एका रात्रीत खूप काही झालं. असं नाही की मी त्यासाठी मी खूप कष्ट केले नाही, पण मी विचार करायचे की जर मी लक्ष केंद्रित केलं आणि समर्पित होऊन काम केलं तर नक्कीच फायदा होईल आणि विश्वास होता की त्यानं नक्कीच मला काही ना काही मिळेल आणि मी या सगळ्या गोष्टींमध्ये मी यशस्वी होईल.
तिनं पुढे सांगितलं की “पण हा, एक कलाकार म्हणून तुम्हाला वाटतं की तुमच्या चित्रपटानं चांगली कामगिरी करावी अशी तुमची इच्छा असते. लोकांनी तुम्हाला पाहावं, तुमचा चित्रपट त्यांना आवडावा आणि मज्जा करावी, चांगला वेळ घालवावा आणि पूर्ण मनोरंजन करावं अशी तुमची इच्छा असते. पण कधीकधी असं होत नाही, ही एक साधारण गोष्ट आहे. हे असं काही आहे ज्या गोष्टीला मी स्विकारलं आहे. माझ्यासाठी एकमेव महत्त्वाची गोष्ट ही आहे की मला चांगलं काम करायचं आहे आणि नव्या गोष्टींता शोध घ्यायचा आहे. मला हे देखील वाटतं की चित्रपट निर्मात्यांनी मला स्क्रिवर काम करताना पहावं. बॉक्स ऑफिस नंबर ही एक अशी गोष्ट आहे, ज्यावर एक कलाकार म्हणून तुमचा कंट्रोल नसतो. त्यामुळे ज्या गोष्टींवर माझं नियंत्रण नाही त्याचा मी विचार करत नाही.”
पुढे मानुषीला प्रश्न विचारण्यात आला की वयानं खूप छोट्या असलेल्या अभिनेत्रीसोबत रोमान्स करण्यावर तिचं काय मत आहे ते विचारलं? तर मानुषी म्हणाली, “अक्षय कुमार बॉलिवूडचा सुपरस्टार आहे. मला त्यांच्यासोबत काम करायचं आहे. सुपरस्टार्ससोबत काम करणं खूप चांगली गोष्ट आहे. यामुळे तुम्हाला स्पष्टता मिळते. जर मी माझ्या पहिल्याच चित्रपटाविषयी बोलेन तर त्या चित्रपटात आमच्यात वयाचा खूप फरक आहे, पण बडे मिया छोटे मियामध्ये कोणत्याही प्रकारे जोडी बनवण्यात आली नव्हती. आम्ही सोबत गाणं केलं, तेपण फक्त मार्केटिंगसाठी. या गाण्यामध्ये त्यांनी दोन लोकांना टाकलं आणि यात मला काही चुकीचं वाटतं नाही. हा चित्रपट कोणती लव्ह स्टोरी नाही.
हेही वाचा :
‘मी वर्ल्डकप खेळणार नाही…’ IPL मध्ये तांडव घालणाऱ्या खेळाडूच्या पोस्टने क्रिकेट विश्वात उडाली खळबळ
अजित पवार गटाच्या नेत्याच्या वक्तव्याने वाढलं शिंदे गटाचं टेन्शन?
मे महिन्यात इतके दिवस राहणार बँका बंद; आजच यादी बघा