मे महिन्यात इतके दिवस राहणार बँका बंद; आजच यादी बघा
मे महिना सुरु व्हायला अवघे काही दिवस उरले आहेत. मे महिन्यात बँका(banks near me) किती दिवस बंद असणार आहे याची यादी समोर आली आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने दिलेल्या यादीनुसार मे महिन्यात जवळपास १२ दिवस बँका बंद राहणार आहेत.
आजकाल सर्व कामे ऑनलाइन होतात. परंतु काही कामांसाठी अनेकांना बँकेत(banks near me) जावे लागते. जर तुमचेही बँकेत काही काम असेल तर ही यादी नक्की बघून जा. मे महिन्यात इंटरनेट बँकिग सेवा चालू राहणार आहे.
मे महिन्यात बँका या दिवशी बंद राहतील
-१ मे- महाराष्ट्र दिवस/ कामगार दिन (१ मेला बेलापुर, बेंगळुरु, चैन्नई, गुवाहाटी, हैदराबाद, आंध्र प्रदेश, तेलंगणा, इंफाळ, कोची, कोलकत्ता, मुंबई, नागपूर, पणजी, पटना, तिरुवनंतपुरम या राज्यात बँका बंद राहणार आहेत.)
-५ मे- रविवार (रविवारी सर्व राज्यातील सर्व बँका बंद राहणार आहेत.)
-८ मे- रविंद्रनाथ टागोर जयंती (यानिमित्त कोलकत्तामधील सर्व बँका बंद राहणार आहेत.)
-१० मे- बसव जयंती/ अक्षय तृतीया (यानिमित्त बेंगळुरुमधील सर्व बँका बंद राहणार आहेत.)
-११ मे- दुसरा शनिवारी (सर्व बँका बंद राहणार आहेत.)
-१२ मे- रविवार
-१६ मे- राज्य दिवस (यानिमित्त गंगटोक येथील सर्व बँका बंद राहतील.)
-२० मे – लोकसभा निवडणूक (यानिमित्त बेलापूर आणि मुंबईतील सर्व बँका बंद राहतील.)
-२३ मे- बुद्ध पोर्णिमा (यानिमित्त आगरतळा, बेलापूर, भोपाळ, चंदीगड, देहराडून, जम्मू, कोलकत्ता, लखनऊ, मुंबई, नागपूर, नवी दिल्ली, रायपूर, रांची, शिमला, श्रीनगर येथील सर्व बँका बंद राहतील. )
हेही वाचा :
माझा ‘तो’ प्लॅन यशस्वी झाला, शरद पवारांनी सगळंच सांगितलं!
आता फक्त ३९९! लोकसभा निवडणुकीत भाजपने उघडलं खातं
‘सूरतला गेल्यावर ठाकरेंकडून मला मुख्यमंत्रिपदाची ऑफर’, एकनाथ शिंदे यांचा मोठा गौप्यस्फोट